Viral Video: सोशल मीडियावरील जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. जंगलातील प्राण्यांबाबतीतल्या अनेक गोष्टी पाहण्यासाठी युजर्सही नेहमीच उत्सुक असतात. आतापर्यंत तुम्ही अनेक व्हिडीओंमध्ये वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता या हिंस्र प्राण्यांना नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. अगदी त्या आपली शिकार शोधण्यापासून ते ती शिकार मिळवण्यापर्यंत हे हिंस्र प्राणी खूप मेहनत घेतात. बऱ्याचदा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही, तर अनेकदा ते यशस्वी होतात; परंतु तुम्ही कधी एखादा वाघ बिबट्यावर हल्ला करत असल्याचे पाहिलं आहे का? असे व्हिडीओ क्वचित आपल्याला पाहायला मिळतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक वाघ चक्क बिबट्यावर हल्ला करत असल्याचे दिसत आहे.

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे असतात. कारण यामध्ये कधी दोन शत्रू प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात, तर अनेकदा दोन मित्र प्राणी एकमेकांवर हल्ला करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ वाघाने बिबट्यावर केलेल्या हल्ल्याचा आहे.

या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये वाघ शिकारीच्या शोधात असताना त्याला एक बिबट्या दिसतो. बिबट्याला पाहून वाघ चवताळतो आणि सरळ त्याच्या पाठोपाठ पळत सुटतो. यावेळी वाघाला सुसाट वेगाने धावताना पाहून बिबट्यादेखील आपला जीव वाचवण्यासाठी एका झाडावर चढतो. वाघदेखील बिबट्याचा पाठलाग करत त्याच्या मागे झाडावर चढतो. पुढे या दोघांमध्ये नक्की काय होतं हे दाखवण्यात आलेले नाही, पण हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ युट्यूबवरील @WildRivals या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरनं लिहिलंय, “बिबट्या खूपच चपळ आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “मी वाघाला पहिल्यांदाच बिबट्याची शिकार करताना पाहिलं.” आणखी एकानं लिहिलंय, “थरारक व्हिडीओ.” आणखी एकानं लिहिलंय, “बिबट्या वाघापेक्षा हुशार आहे.”