Husband’s Simple Gesture Viral Video : आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या असतात. एखाद्याला पाय लागला की, आदराने पाय पडणे, आईने भाजी चांगली बनवल्यावर तिचे कौतुक करणे, बाबांनी एखादी वस्तू न सांगता आणणे, कामावरून थकून आल्यावर त्यांच्या हातात चहा देणे आदी अनेक गोष्टी चेहऱ्यावर नकळत आनंद देऊन जातात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये बायकोचा राग काही क्षणांत नवऱ्याने दूर केल्याचे दिसतेय, जे पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल.

आई दिवस-रात्र मेहनत करून खूप दमलेली असते. अशातच छोट्या छोट्या गोष्टीत ती लगेच चिडताना दिसते. पण, तिची चिडचिड कशी दूर करायची याची चावी फक्त तिच्या जोडीदाराकडेच असते. व्हायरल व्हिडीओतही तसेच दृश्य पाहायला मिळाले आहे. आई जेवण करत असताना कोणत्या तरी कारणावरून चिडलेली असते आणि रागात ती पटापट पोळ्या लाटून जोडीदाराच्या ताटात वाढत असते. पण, रागाचे कारण न विचारता, तोही जबरदस्त जुगाड करून तिच्या चेहऱ्यावर हसू आणतो.

अजून काय पाहिजे स्त्रियांना (Viral Video)

स्वयंपाक, भांडी, कपडे आदी अनेक कामांमुळे स्त्रियांना खूप थकतात आणि मग स्वाभाविकत:च त्यांची चिडचिड होते. त्यामुळे कित्येकदा घरातील वातावरणही ‘गरम’ होते. कुटुंबातील सदस्यांनी अशा प्रसंगी तिच्याप्रति प्रेम वा कौतुकाचे चार शब्द व्यक्त केल्याने हा ताण सैल होऊ शकतो. प्रेम वा आदर एवढीच तर माफक अपेक्षा त्या कुटुंबीयांकडून ठेवतात ना. जेवण करताना चिडचिड झाल्यावरही त्या जोडीदाराने प्रेमाची फुंकर घालावी, अशी अपेक्षा करीत असतात.

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, जेवण करताना चिडचिड करणाऱ्या पत्नीकडे पाहून नवरा कापडाचा पंखा हातात घेतो आणि पोळी लाटताना तिला हवा घालण्यास सुरुवात करतो. ते पाहून नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू येते. सुखी संसाराचे इंगित सांगणारा सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्हीही एकदा नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @you_need_it या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “या छोट्या छोट्या गोष्टी स्त्रियांसाठी खूप मोठ्या असतात… तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की, त्यांच्या जोडीदाराने अशा प्रकारे राग घालवणे त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असतो”, “अजून काय पाहिजे स्त्रियांना”, “बहुतेक महिला तक्रार करतात. कारण- त्यांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केले जाते. घरातील कामांना क्वचितच महत्त्व दिले जाते. तरीही जेव्हा दोन्ही जोडीदार एकमेकांच्या प्रयत्नांचा आदर करतात तेव्हाच नाते आणखीन फुलते. जीवन संतुलित ठेवण्याचा हा एकमेव मार्ग आहे” आदी अनेक मते नेटकरी कमेंट्समध्ये मांडताना दिसत आहेत.