Viral Video: सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्स व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्स व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण सोशल मीडियावर डान्स सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक जोडपं सुंदर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हल्ली व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमुळे पती-पत्नीमधील भांडणं, प्रेम, मजामस्ती अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकवेळ पती-पत्नीचे गुण नाही जुळले तरी चालेल पण त्यांची आवड-निवड जुळायला हवी. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातील आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला एक जोडपे डान्स करताना दिसत असेल. त्यांच्या अवती भोवती काही नातेवाईक आणि कुटुंबातील लोक बसलेले दिसत आहे. सर्व जण आवडीने त्यांचा डान्स पाहताना दिसत आहे. हे जोडपे अतिशय सुंदर दिसत आहे. “छोकरा जवारे” या गाण्यावर हे जोडपं डान्स करत आहे. पत्नीने सुंदर साडी नेसली आहे. अगदी सुंदर सोप्या डान्स स्टेप्स करत हे दोघेही सुंदर डान्स करत आहे. या पती पत्नीमधील प्रेम पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हिडीओ:

व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @official_sandipjadhav_07या अकाउंटवर शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “म्हणून लग्न थोडं Late करायचं पण आवडत्या व्यक्तीसोबतच करायचं..” असं लिहिलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत मिलियन्समध्ये व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूपच भारी केला डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘भावा खूप छान’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘कमाल केली या दोघांनी.’