अमेरिकत राहणाऱ्या एका भारतीय जोडप्याने थेट पारंपारिक भारतीय पोषाखामध्ये स्कीइंग केलं आहे. धोतर आणि साडी नेतून स्कीइंग करतानाच या जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेत आहे.
अमेरिकेतील मिनेसोटा येथील दिव्या मैया आणि तिचा नवरा मधू या दोघांनी हा व्हिडीओ शूट केलाय. वेल्च येथे बर्फामध्ये स्कीइंग करताना या दोघांनी काहीतरी हटके करण्याच्या इराद्याने पारंपारिक भारतीय कपड्यांमध्ये स्कीइंग करण्याचं ठरवलं आणि त्यांनी हे करुन दाखवलं. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि दिव्याने तिच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेत.
आम्हाला आज खूपच काहीतरी हटके करायचं होतं म्हणून आम्ही हे करण्याचं ठरवलं असं दिव्याने आपल्या पाहिल्याच पोस्टमध्ये म्हटलं आहे.
View this post on Instagram
तर अन्य एका पोस्टमध्ये तिने आपल्या नवऱ्यासोबतचा साडी आणि धोतर नेसून स्कीइंग करताना फोटो पोस्ट केलाय. माझ्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये आणि वेडेपणामध्ये सहभागी होणारा हा माझा जोडीदार. तसेच मी पोस्ट केलेल्या साडीतील स्कीइंगच्या व्हिडीओवर तुम्ही जे प्रेम व्यक्त करत आहात त्यासाठी धन्यवाद, असं दिव्याने म्हटलं आहे.
View this post on Instagram
त्याचप्रमाणे तिसऱ्या पोस्टमध्ये हा व्हिडीओ कशापद्धतीने शूट करण्यात आलाय हे दाखवणारी क्लिप दिव्याने शेअर केलीय.
View this post on Instagram
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दिव्याने पोस्ट केलेल्या मूळ व्हिडीओला २२ हजारहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. दिव्याने ज्या गोष्टीला वेडेपणा म्हणजेच क्रेझी गोष्ट म्हटलं आहे ती साडी आणि धोतरामधील क्रेझी गोष्ट नेटकऱ्यांनाही प्रचंड आवडल्याचं सध्या तरी दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करुन व्हिडीओ आम्हाला खूप आवडल्याचं म्हटलं आहे. हे जे काही आहे ते खूप भन्नाट आहे, मी अनेकदा हा व्हिडीओ पाहिला, भारीय हे, मस्त अशा कमेंटबरोबरच अनेकांनी हार्ट तसेच फायर इमोन्जी पोस्ट करत या दोघांच्या या आगळ्यावेगळ्या प्रयत्नांना दाद दिलीय.