Shocking video: मुलंही आई-वडीलांची म्हातारपणाची काठी असतात. आपल्या पश्चात आपल्या मुलांनी एकत्र गुण्यागोविंदाने राहावे, एकमेकांना मदत करावी अशी प्रत्येक आई-वडीलांची इच्छा असते. परंतू माणुसकीला मान खाली घालायला लावणारी एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे अनेकांचा संताप झाला आहे. एकिकडे आईचा मृतदेह होता जो अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आणला गेला होता, तर दुसरीकडे तिनेच जन्माला घातलेले दोन पोरं तिच्या चांदीच्या बांगड्यांसाठी भांडत होती. एवढंच नाहीतर एका मुलाने आपल्या आईच्या चितेवर झोपून अंत्यसंस्कारापूर्वी चांदीचे कडे मागण्याचा हट्ट धरला.
राजस्थानच्या कोटपूतली-बहरोड जिल्ह्यात ही मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी कोटपूतली-बहरोड जिल्ह्यातील विराट नगर तहसीलमधील लीलाचा बास ढाणी येथे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. मृत महिलेच्या मुलांमध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. जयपूरच्या लीला गावातील निवासी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. तिच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली. नातेवाईक, शेजारी जमले. अंत्यसंस्कारासाठी तिलास्मशानभूमीत नेण्यात आलं आणि तिथेच हे दोघे भाऊ भांडायला लागले.
व्हिडिओमध्ये दिसून येतं की कशाप्रकारे आईचा मृतदेह हाती घेऊन काही लोक उभे आहेत. पण हे दोघं भाऊ चांदीच्या बांगड्यांसाठी भांडत आहेत. ते आईचा मृतदेह चितेवर ठेवू देत नाहीयेत. त्या चांदीच्या बांगड्या त्यांच्या आईच्या होत्या. व्हिडिओमध्ये हे दोघे भाऊ या बांगड्यांसाठी एकमेकांना शिवीगाळ करतानाही दिसत आहेत.त्यांनी अट घातली की, जोपर्यंत आईचे चांदीचे कडे मिळणार नाहीत, तोपर्यंत अंत्यसंस्कार होऊ देणार नाहीत. आईचे शव जमिनीवर पडले होते, पण मुलांनी अक्षरश: हद्दच पार केली.
पाहा व्हिडीओ
चांदीच्या बांगड्यांसाठी गोंधळ
जेव्हा भूरी देवी यांचा मृत्यू झाला, तेव्हा कुटुंबीयांनी तिचे दागिने काढून घेतले आणि ते मृत महिलेच्या सर्वात मोठ्या मुलाला, गिरधारीला, सुपूर्द केले. त्यानंतर मृतदेह अंतिम संस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आला. ओमप्रकाशचा आपल्या भावांशी मालमत्तेवरून वाद होता. त्यामुळे स्मशानभूमीत पोहोचल्यानंतर त्याने गोंधळ घातला. आईचा मृतदेह चितेवर ठेवण्यापूर्वी ओमप्रकाश चितेवर झोपला आणि चांदीच्या बांगड्यांसाठी भांडण करू लागला. कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी त्याला खूप समजावले, पण ओमप्रकाश ऐकला नाही.