lion attacks: जगभरात अनेक निरनिराळे प्राणी आढळून येतात. अनेक लोकांना प्राण्यांच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायचे असते. त्यांची राहणी, जीवनशैली यामध्ये जास्त रस असतो. यासाठी लोक जंगल सफारी, झू मध्ये जातात. वन्या प्राणी म्हटल्यावर कधी काय करतील काही सांगता येत नाही. रागाच्या भरात हल्ला करण्यासही ते मागे पुढे बघत नाही. सोशल मीडियावर तर असे प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.अशातच ते पोट भरण्यासाठी कोणाचीही शिकार करताना दिसून येतात. काही वेळा प्राणी हे स्वत:च्या मालकावरही हल्ला करतात. अशाच एका सिंहानं केलेल्या शिकारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून खरंच तुम्हीही शॉक व्हाल.
एका क्षणात खेळ खल्लास
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वृद्ध व्यक्ती मोकळ्या आवारात चालत असताना दिसत आहे. तेवढ्यात अचानक समोरुन मोठा सिंह या वृद्ध व्यक्तीच्या दिशेने धाव घेतो, हे पाहून हा व्यक्ती तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, ताकदवान सिंहासमोर या व्यक्तीचं काही एक चालत नाही. सिंह वृद्ध व्यक्तीच्या अंगावर झडप घालतो आणि भक्ष्याप्रमाणे धरून झुडपाकडे खेचतो. सिंह वृद्ध माणसावर हल्ला करत असताना, एका महिलेच्या किंकाळ्या ऐकू येतात, जी मदतीसाठी याचना करत आहे. मात्र कोणीही मदतीसाठी येत नाही, आणि सिंह वृद्ध व्यक्तीला आपल्या तोंडात पकडून झुडपात घेऊन जातो.
पाहा व्हिडीओ-
हेही वाचा – Viral video: माकडाशी पंगा घेणं तरुणीच्या अंगलट; केस ओढून शिकवला चांगलाच धडा
टेरिफायिंग नेचर @TerrifyingNatur नावाच्या पेजने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ पेस्ट करताना एक कॅप्शन देखील देण्यात आले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, “भयानक क्षण सिंहाने ब्रिटीश पार्क मालकावर क्रूरपणे हल्ला केला” कॅप्शनमध्ये माहिती दिली आहे की हा व्हिडिओ ब्रिटिश पार्कचा आहे.
दरम्यान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येत असतात. हल्ल्याच्या अनेक भयंकर आणि धोकादायक व्हिडीओ समोर येत असतात. शिकारीसाठी प्राणी जीवाची बाजी लावताना दिसून येतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांचीही चांगली पसंती असते. व्हिडीओवर भरपूर कमेंट आणि लाईक्सचाही वर्षाव होताना दिसतोय