Ek Numbar Tuzi Kambar Dance Video : लहान मुले ही देवाघरची फुले असे म्हंटले जाते. मुलांचा निरागसपणा आणि त्यांच्या भावना अगदी निस्वार्थी असतात. त्यामुळेच मनावर ताण आला तर लहान मुलांशी खेळण्याने तो आपसूकच निघून जातो असे अनेकदा तुम्हालाही जाणवले असेल. एखाद्याला कधी मारून रडवतील तर कधी मजेशीर तोंड करून हसवतील काही सांगता येत नाही. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये एका चिमुकलीने चक्क डान्स करून सगळ्यांची मने जिंकली आहेत.

काही दिवसांपासून संजू राठोडचं ‘एक नंबर तुझी कंबर’ हे गाणे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. अनेक जण या गाण्यावर त्यांच्या आवडीनुसार तयार होताना, तयार होऊन रिल्स बनवताना दिसत आहेत. तर आज एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर ती डान्स करण्यास सुरुवात करते. “ही चाल shaky shaky” या गाण्याच्या ओळींवर चिमुकलीने केलेली क्युट स्टेप्स प्रचंड व्हायरल होते आहे; जी तुमचेही मन जिंकेल एवढे तर नक्की.

‘या’ ट्रेंडची विजेती (Viral Video)

एखादे गाणे व्हायरल झाले की, सगळेच त्या गाण्यावर डान्स करण्याचा ट्रेंड फॉलो करायला सुरुवात करतात. तुम्ही व्हिडीओत पाहिले असेल की, काही चिमुकल्या मिळून ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यामध्ये एका चिमुकलीने “ही चाल shaky shaky” या गाण्याच्या ओळींवर ज्या मजेशीर पद्धतीने कंबर हलवली आहे ते पाहून सगळेच तिच्या प्रेमात पडले आहेत. प्रेक्षकांमध्ये उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडीओ स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @banger.update या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी ‘चिमुकलीला या ट्रेंडची विजेती’ म्हणताना दिसत आहेत. तर काही जण ‘हा व्हिडीओ नेपाळचा आहे’ असे म्हणताना दिसत आहेत. तर अनेक जण त्यांच्या डान्स व्हिडीओला वेगवेगळ्या इमोजी वापरून चिमुकल्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. एकूणच या चिमुकलीच्या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.