Viral Video: मंगळागौर महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्येदेखील बऱ्याच ठिकाणी साजरी करण्याची प्रथा आहे. नवविवाहित स्त्रियांसाठी हा सण प्रामुख्याने साजरा करतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते. यंदादेखील अनेक ठिकाणी मंगळागौर साजरी करण्यात आली.
हल्ली श्रावणात अनेक ठिकाणी मंगळागौरीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अनेक हौशी महिला सहभागी होऊल. मंगळागौरीचे खेळ खेळतात. सध्या एका मंगळागौरीच्या कार्यक्रमातील असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मंगळागौरीच्या व्रतामध्ये देवी पार्वतीच्या पूजेबरोबर महादेवांची पूजादेखील केली जाते. अनेक ठिकाणी हे व्रत अविवाहित मुली सौभाग्य प्राप्तीसाठी आणि विवाहित महिला अखंड सौभाग्यासाठी करतात. हे व्रत केल्याने वैवाहिक आयुष्य सुखमय होते व कुटुंबात सुख-समृद्धी नांदते असे म्हटले जाते. तसेच या व्रतामुळे देवी पार्वतीसह महादेवांचा आशीर्वाददेखील प्राप्त होतो. या दिवशी सर्व महिला एकत्र येऊन विविध खेळ खेळतात, झिम्मा, फुगडी खेळतात. गाणी गातात. यामुळे महिलांनी रोजच्या कामातून विरंगुळा मिळतो. हल्ली या कार्यक्रमांमध्ये लहान मुलीही आनंदाने सहभागी होतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ एक चिमुकली सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली सुंदर नऊवारी साडी नेसून सुंदर डान्स करतेय. यावेळी चिमुकली ‘चक चक सोन्याचा’ या गणपतीच्या गाण्यावर सुंदर नाचतेय. तिचा हा डान्स पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @jiteshraddha या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत सहा लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत आणि यावर हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय अनेक नेटकरीही यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका युजरने लिहिलंय की, “माझ्या चेहऱ्यावरचं स्मित हास्य व्हिडीओ संपेपर्यंत तसंच होते.”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “एक नंबर दिदी”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “इवल्याश्या वयात काय अप्रतिम भाव आहेत ह्या नृत्यात”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप छान बाळा”