Little Girl Viral Self Love Video : इतरांना जपणे, त्यांना वेळ देणे, त्यांच्या आवडी-निवडीकडे लक्ष देताना माणूस कुठेतरी स्वत:वर प्रेम करायला विसरून जातो. आपल्याला काय आवडते त्यासाठी वेळ काढणे आणि वेळ देणे भरपूर महत्त्वाचे असते. दिवसभर काम करून एक तास फक्त स्वतःच्या आवडीची एखादी गोष्ट तरी आपण करतो का, हा प्रश्न जर स्वतःला विचारला तर ‘नाही’ असेच तुमच्या मनातून उत्तर येईल. पण, आज व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय असते, हे एका चिमुकलीने दाखवले आहे.

सिग्नल लागल्यावर जेव्हा गाड्या थांबतात तेव्हा आपसूकच आपले लक्ष रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांकडे जाते. ही माणसे कशी राहत असतील, काय खात असतील, स्वतःच्या गरज कशा पूर्ण करत असतील असे असंख्य प्रश्न आपल्या समोर येऊन उभे राहतात. पण, त्यांच्याकडे पाहिले की ते स्वतःजवळ काहीच नाही असे समजून कधीच गप्प बसत नाहीत. खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी ते ऊन असो, पाऊस असो किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूत पैसे कमावण्यासाठी आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात.

तरच जग तुमचा आदर करेल… (Viral Video)

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, सिग्नल लागल्यावर गाडी थांबते आणि चालकाचे लक्ष रस्त्याकडेला असणाऱ्या एका चिमुकलीकडे जाते. चिमुकली रस्त्याच्या कडेला बसून तिच्या आवडीची नेलपेंट तिच्या नखांना लावताना दिसते आहे. नेलपेंट लावून ती स्वतःची आवड पूर्ण करत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर कसे प्रेम करावे हे जगाला सांगते आहे. हे दृश्य पाहिले आणि अज्ञात गाडीचालकाने याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट करून घेतला आहे. चिमुकलीचा व्हायरल व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @reelsbynayra या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “रस्त्यावर नेलपॉलिश लावणारी ही मुलगी आम्हाला हे शिकवते की, परिस्थिती काहीही असो, स्वतःवर प्रेम करणे कधीही थांबवू नका”; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा हा व्हिडीओ पाहून सहमती दर्शविताना दिसत आहेत आणि “हो! जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले तर जग तुमचा आदर करेल”, “तुम्हीच स्वतःला आनंदी ठेवू शकता, पण इतरांमध्ये आनंद शोधायला गेलात तर पदरात निराशाच येईल”, “जे मिळालं आहे त्यात सुखी राहता आलं पाहिजे”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.