Aunt And Nephew Dance Viral Video : सध्या लग्न समारंभ असो किंवा आणखीन कोणता कार्यक्रम असत डान्स करणे आता ट्रेंडच झाला आहे. नवऱ्यासाठी किंवा नवरीसाठी डान्स, आई-बाबा, बहिणी किंवा भावासाठी डान्स करण्यासाठी वेगवेगळ्या गाण्याद्वारे त्यांच्या भावना व्यक्त करत असतात. पण, आज एका अनोख्या जोडीचा डान्स व्हायरल होतो आहे. आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत चिमुकला भाच्याने आणि आत्याच्या संगीत कार्यक्रमात जबरदस्त डान्स केलेला दिसतो आहे.
@hardi__kaneria या इन्स्टाग्राम युजरचा संगीत कार्यक्रम सुरु असतो. या संगीत कार्यक्रमात चिमुकल्या भाच्याने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कुछ कुछ होता है या सिनेमातील ‘ये लड़का है दीवाना’ या गाण्यावर दोघांनी जबरदस्त डान्स केला आहे. त्याच्या इवल्याश्या पावलांनी, क्युट हावभावांनी आणि स्टेप्सने सगळ्यांनाच हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघायला भाग पाडले आहे. होणाऱ्या नवरीची बहीण आणि तिचे काही मित्र मिळून त्याला डान्स स्टेप्स करण्यासाठी मदत करताना दिसत आहेत. पण, तो स्वतःच्या धुंदीत डान्स करताना दिसतो आहे. भाच्याला नाचण्याचा आनंद घेण्यासाठी डान्सला कशाप्रकारे मजेदार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला हे तुम्हाला व्हिडीओत दिसेल.
एक आठवण जी कायम आत्याजवळ राहील… (Viral Video)
त्यांनी या डान्ससाठी भरपूर सराव केला. पण, संगीत कार्यक्रमाच्या दिवशी परफॉर्मन्स त्यांच्या योजनेप्रमाणे सफल झाला नाही. त्यांनी ठरल्याप्रमाणे भाच्याने स्टेप्स केल्या नाहीत किंवा यांनी त्याला ठरलेल्या स्टेप्स करायला भाग सुद्ध पाडले नाही. पण, आत्याबरोबर नाचण्यात त्याला जी मजा आली ती शब्दात सांगणे कठीण आहे असे म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावर हा खास व्हिडीओ व्हायरल झाल्या नंतर त्याला १ मिलियन व्ह्यूव्ह्ज मिळाले आणि मग आत्याने म्हणजेच @hardi__kaneria इन्स्टाग्राम युजरने त्यांच्या सरावाचा व्हिडीओही पोस्ट केला.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @hardi__kaneria या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “आमच्या संगीत सादरीकरणाच्या रीलवरील प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद! ही निश्चितच एक आठवण जी मी कायम माझ्याजवळ जपून ठेवेन. माझ्या पुतण्यांच्या सादरीकरणाने हास्य आणि आनंद पसरवला याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. तुमच्यापैकी बरेच जण तुमच्या स्वतःच्या पुतण्या किंवा भाचीबरोबर डान्स करण्याचा विचार करत असाल तर हा सराव व्हिडीओ तुमच्यासाठी आहे” ; अशी कॅप्शन दिली आहे.