Viral video: तुम्ही एखाद्या जुन्या कॅफे किंवा हॉटेलवर विश्वास ठेवून तिथे खायला म्हणून जात असाल, तर आधी हा व्हिडीओ पहा. पुण्यातल्या कल्याणी नगर इथल्या इराणी कॅफेमध्ये हा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे.

या इराणी कॅफेमध्ये एका व्यक्तीने चीझ चिली टोस्ट ऑर्डर केले होते. ऑर्डर आल्यानंतर या व्यक्तीला शंका आल्याने त्याने हे टोस्ट नीट पाहिले असता यामध्ये त्याला अळ्या आढळल्या. या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, कदाचित यात वापरले गेलेले चीझ हे खराब झालेले असावे. एकंदरच हा प्रकार संतापजनक असल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे.

सॅम्युअल गोडे असं या व्यक्तीचं नाव आहे. तो त्याच्या कुटुंबियांसोबत इराणी कॅफेमध्ये गेला असता हा प्रकार घडला. ही बाब समोर येताच त्याने याबाबत मॅनेजरला सांगितले मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. तसंच इथल्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे समोर आले आहे. सॅम्युअल गोडे या व्यक्तीने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. त्यात त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तेव्हा जर तुम्ही बाहेर जेवायला जात असाल तरअन्न काय दर्जाचे, त्याची सुरक्षितता, तिथली स्वच्छता, कर्मचाऱ्यांची स्वच्छता या आणि अशा अनेक गोष्टींबाबत जाणून घ्या.