Viral video: रेल्वेस्थानकात प्रवाशांच्या मोबाइल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोर रेल्वेस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत चोऱ्या करतात. लोकल ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते, त्यामुळे लोकल ट्रेनमध्ये अनेकदा चोरीच्या घटना घडतात. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूंवर डल्ला मारतात. म्हणूनच लोकलमधून प्रवास करताना अनेक जण मोबाइल चोरीला जाणार नाही, याची काळजी घेत असतात. मात्र, चोर आता नवनवीन आयडिया शोधून काढतात. आता ट्रेनमध्येच नाही, तर हे चोरटे मेट्रोमध्येही प्रवाशांच्या खिशावर हात साफ करताना दिसत आहेत. अशीच एक घटना दिल्ली मेट्रोमधून समोर आली आहे. दिल्लीत खिशातून पाकीट आणि फोन चोरीला जाणे खूप सामान्य आहे. पण, मेट्रोच्या गर्दीत एका काकांचं पाकीट चोरणं चोराला चांगलंच महागात पडलं आणि त्याची किंमत चोराला चुकवावी लागलीय, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये चोराला रंगेहात पकडलं

मेट्रोतून पाकीट चोरणाऱ्या चोराला प्रवाशांनी रंगेहात पकडलं. चोरी करून हा चोरटा पसार होण्याच्या प्रयत्नात होता, मात्र तितक्यात प्रवाशांनी त्याला पकडलं. प्रवाशांनी चोरट्याला धरून ठेवलं. हा व्हिडीओ काश्मिरी गेट मेट्रोचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मेट्रोमधून प्रवास करताना काकांचं पाकीट चोरण्याचा चोरट्याचा प्रयत्न फसला. पाकीट चोरताना काकांनी चोरट्याला रंगेहात पकडले, त्यानंतर काकांनी चोराला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत चांगलाच धडा शिकवला. जणू काही ते काका दिवसभराचा राग त्या चोरावर काढत होते.

“मी मरेन काका, मला जाऊ द्या”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चोर पकडला जाताच तो रडायला लागतो आणि “मला माफ करा, मी आतापासून असे करणार नाही. मी मरेन काका, मला जाऊ द्या”, अशी माफी मागू लागला. मात्र, काकांनी त्याच्यावर जराही दया न दाखवता त्याला चांगलाच चोप दिला. चोराने एवढा मार खाल्ला की तो यापुढे चोरी करण्याचा विचारही करू शकत नाही. दरम्यान, एवढ्या गर्दीतही चोराच्या ओरडण्याची ना कुणाला दया आली ना काकांचा राग शांत करण्याचे धाडस कुणाला झाले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> गावची पोरंच लय भारी! पेट्रोल शिवाय धावणारी बाईक; देसी जुगाडचा VIDEO पाहून व्हाल अवाक्

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमारे ७४ हजार वेळा पाहिला गेलेला हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजर्स व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले… काका आज घरातील सर्व राग चोरावर काढणार आहेत असे दिसते. दुसऱ्या युजरने लिहिले… काका सोडा, गरीब माणूस मरेल; तर आणखी एका वापरकर्त्याने लिहिले… ही एका मध्यमवर्गीय व्यक्तीची निराशा आहे.