Viral Video: सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये ज्यात कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक बिबट्या मनुष्य वस्तीमध्ये आल्याचे दिसत आहे. पण यावेळी अचानक असं काहीतरी होतं जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.

वाघ, सिंह, बिबट्या हे हिंस्र प्राणी बऱ्याचदा मानवी वस्तीमध्ये देखील शिरकाव करतात. हे प्राणी आपल्या परिसरात फिरत असल्याची बातमी कळताच लोक घराबाहेर पडताना देखील दहावेळा विचार करतात, पण या व्हायरल व्हिडीओमध्ये वेगळंच काहीतरी पाहायला मिळत आहे. या परिसरात आलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी आवर्जून गर्दी केली शिवाय यावेळी ते बिबट्याचा फोटो देखील काढत होते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रस्त्याच्या कडेला गवतामध्ये एक बिबट्या निवांत बसलेला दिसत आहे, यावेळी आसपासच्या परिसरातील अनेक पुरुष मंडळी बिबट्याला पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात, तसेच यावेळी अनेकजण बिबट्याचा फोटो, व्हिडीओ देखील काढतात. पण यावेळी अचानक शांत बसलेला बिबट्या उठून हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. यावेळी जमा झालेले पुरुष मंडळी दूर पळून जातात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: मनीमाऊचा स्वॅग! पुण्यातील ऑफिसमध्ये मांजरीचे स्वागत करून घातले बारसे; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “मांजरीला एक सुंदर…”

पाहा व्हिडीओ:

या व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @video.zone_ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास ५ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तसेच यावर बत्तीस हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “भावाला वाटलं ती मांजर आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “हो अजून घ्या सेल्फी”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “बिबट्या म्हणत असेल माझ्या आतल्या प्राण्याला जागं करु नका”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “आणखी बनवा व्हिडीओ”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “हे तर होणारच होतं”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यापूर्वी देखील प्राण्यांचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये बऱ्याचदा वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या प्राण्यांनी मनुष्य वस्तीमध्ये शिरकाव करुन लोकांवर हल्ला केला होता. हे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.