Viral Video: संसार म्हटला की प्रेम, भांडण, मजामस्ती या सगळ्या गोष्टी आल्याचं. असं म्हणतात, लग्नासाठी पती-पत्नीचे ३६ गुण जुळो न जुळो पण दोघांचे मन जुळायला हवे. तेव्हाच तो संसार सुखा-समाधानाचा होतो. सोशल मीडियावर अनेक जोडप्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ज्यातील काही व्हिडीओंमध्ये कधी पतीमधील गोड क्षण पाहायला मिळत आहे. तर कधी भांडण पाहायला मिळतं. दरम्यान, आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात पती-पत्नी एकमेकांबरोबर सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण सोशल मीडियावर वेगवेगळी कला सादर करताना दिसतात, ज्यात डान्स करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक पाहायला मिळते. आताही असाच एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात पती-पत्नी नाचताना दिसतायत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये पती आणि पत्नी “दिल में जो बातें हैं” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावही पाहण्यासारखे आहेत. त्यांचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vikramjadhav4687 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत पाच लाखाहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
एका युजरने लिहिलंय की, “सीमा भागातील तुमची जोडी काही दिवसांत सुपरहिट होणार….” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “सिम्पल पण जबरदस्त”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “तुमची जोडी खुप छान आहे”