Viral Video: ठिकठिकाणी जंगलतोड केल्यामुळे तर काही ठिकाणी पाणीटंचाई असल्यामुळे जंगलातील प्राण्यांच्या चारा व पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो. जंगलातील वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधात सगळीकडे वणवण भटकत आहेत. जंगलात अन्न पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. बंगळुरूमध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे दोन माकडे पाण्याच्या शोधात एका व्यक्तीच्या स्वयंपाकघरात शिरले आहेत .

व्हायरल व्हिडीओ बंगळुरूचा आहे. घराच्या खिडकीतून दोन माकडे स्वयंपाकघरात शिरली. एक माकड खिडकीबाहेर बसून होते तर दुसरे माकड चक्क स्वयंपाक घराच्या ओट्यावर बसले होते. बघता बघता माकड वॉटर प्युरिफायरच्या नळावाटे पाणी पिण्याचा प्रयत्न करते व स्वतःची तहान भागवण्यास सुरुवात करते. एकदा पाहाच हा व्हिडीओ.

हेही वाचा…प्रसिद्धी नाही तर प्रेमासाठी… आलिशान हॉटेलची नोकरी सोडून शेफने सुरू केला ‘हा’ व्यवसाय, पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

वॉटर प्युरिफायरमधून पाणी पिण्याच्या प्रयत्नात असलेल्या माकडाचा व्हिडीओ बंगळुरूच्या घरमालकाने शेअर केला आहे. घरमालक स्वयंपाक घरात शिरलेल्या माकडांना हाकलण्याचा प्रयन्त करतो मात्र पाण्याच्या शोधात असणारा माकड वॉटर प्युरिफायरवाटे स्वतःची वारंवार तहान भागवताना दिसतो ; जे पाहून तुम्हाला नवल आणि चिंता दोन्ही वाटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @akshattak या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘बंगळुरूच्या जलसंकटाचा फटका मानवापेक्षा प्राण्यांना बसला आहे ; त्यांची मदत करण्यासाठी पाणी वाचवूया’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला दिली आहे. एकूणच स्वयंपाकघरातील वॉटर प्युरिफायर ओट्यावर बसलेल्या माकडाची तहान भागवताना दिसत आहे.