Viral Video: सध्या फूड स्टॉल प्रचंड चर्चेत आहे. फूड ट्रक, घरात छोटंसं दुकान उघडणे, स्टॉल किंवा धाबा चालू करणे आदी विविध स्टाईलने विक्रेते खाद्यपदार्थ विकतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण, येथे एका शेफने आलिशान हॉटेलची नोकरी सोडून स्वतःचा ढाबा सुरू केला आहे व यामागील हटके कारणदेखील सांगितलं आहे, जे तुमचं मन जिंकून घेईल.

एका फूड ब्लॉगरने अलीकडेच रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेफच्या ढाब्याला भेट दिली. चंदीगडच्या या ढाब्याचा मालक पूर्वी मॅरिएट (Marriott) मध्ये शेफ म्हणून काम करत होता. पण, त्याने नोकरी सोडून स्वतःच्या स्वयंपाक कौशल्याचा अनोखा वापर करण्याचे ठरवले. आलिशान हॉटेलची नोकरी सोडून त्यांनी रस्त्याकडेला एक छोटासा ढाबा उघडण्याचे ठरवले. त्याने असं का करायचे ठरवले व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…धक्कदायक! संतापलेला बैल थेट शिरला दुकानात अन् उध्वस्त केलं सामान… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, शेफ तंदूरमध्ये रोट्या तयार करत होता. ब्लॉगरने त्याला विचारले की , मॅरिएटमध्ये शेफची नोकरी असताना तुम्ही रस्त्याच्या कडेला शेफ म्हणून का काम करत आहात. त्यावर शेफ म्हणतो की, “येथे काम करायला मला मज्जा वाटते आहे. हॉटेलमध्ये मला फक्त पैसेच मिळत होत. पण, येथे मला फक्त पैसेच मिळत नाहीत, तर प्रेमही मिळते आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @foodpandits या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. शेफचा हा ढाबा चंदीगडमध्ये ‘रनिंग ढाबा ऑन स्ट्रीट्स’ या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच या दिवसासाठी त्याने एक खास मेन्यू ठरवला व तंदूरमधल्या रोट्या, काळे चणे, दाल मखनी, मटर पनीर, बूंदी रायता चार कंपार्टमेंट असणाऱ्या स्टीलच्या प्लेटमध्ये सर्व्ह केला आहे.