करोना हा शब्द जरी ऐकला तरी लॉकडाऊनमधली ती दोन वर्षे सरकन डोळ्यासमोर येऊ लागतात. पोटचं पोरंगही अंतर देऊन राहू लागलं होतं… आपण जे मोबाईलवर स्टेटस ठेवतो ना त्यावरच समजंत होतं कोण आहे आणि कोणं गेलयं…एवढंच काय आपल्या कुटूंबियांना सुद्धा भेटणं अवघड झालं होतं… तो काळ आठवला तरी आजही अंगावर काटा उभा राहतो. भाऊ, बहिण, आई, वडील सगळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते आणि त्या काळात एकमेकांना भेटून आधार देण्याची इच्छा असली तरी फक्त फोनवर बोलण्याव्यतिरिक्त कुणीही काहीही करू शकत नव्हतं. जेव्हा लॉकडाऊन संपल्यानंतर सगळ्यांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी धाव घेतली, त्यावेळी सर्वच जण भावूक देखील झाले. पण या भावना फक्त माणसांमध्येच असतात, असं नाही. याच क्षणांची आठवण करून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुद्धा करोना काळाची आठवणी होईल, हे मात्र नक्की.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन माकडांचे कुटूंब बऱ्याच दिवसानंतर एकमेकांना भेटतात. या माकडांच्या कुटूंबाकडं पाहिल्यानंतर प्राण्यांनाही कुटूंब असतं, त्यांच्यासाठीच्या भावना असतात, याची प्रचिती येते. दोन माकडांचं कुटूंब एकमेकांना भेटल्यानंतर कशा पद्धतीने एकमेकांच्या गळ्यात पडून मिठी मारून भेटतात, हे या व्हिडीओतून दिसतं. यातलं एक माकड त्याच्या दुसऱ्या माकडाकडे असलेल्या पिल्लाला छातीशी धरतं आणि त्याला गोंजारतं. दोन्ही माकडांनी आपल्या पिल्लाला पाठीवर घेतलेलं असतं. अगदी माणसांप्रमाणेच हे माकड आपल्या कुटूंबियांना भेटताना दिसून आले.

आणखी वाचा : शंभरी पार केलेल्या आजीबाईंनी पॅराजम्पिंग करत रचला वर्ल्ड रेकॉर्ड, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फूड डिलिव्हरीचा हा मजेदार अंदाज एकदा पाहा, Zomato ने लिहिले, ‘ट्राय इट युअर ओन रिस्क’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा भावूक व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘महामारीनंतर जेव्हा कुटूंब एकमेकांना भेटतं..’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर तीन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.