Viral Video Celebrating Son’s Journey As Captain : मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी स्वतःची सुख-दुःखं बाजूला ठेवून आई-बाबा दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्यामुळे आपल्या मुलानं डॉक्टर, वकील, इंजिनीअर, कॅप्टन किंवा अगदी कुठल्याही क्षेत्रात त्यांच्या करिअरची सुरुवात करताना पाहिलं की, आई-बाबांना जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. कॅप्टन म्हणून सुरू झालेला लेकाचा नवीन प्रवास पाहून आई-बाबा भारावून गेले आहेत.
व्हायरल व्हिडीओत एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बाबा आणि आईचा मुलगा आदित्य कॅप्टन झाला आहे. त्यानिमित्त हा कार्यक्रम त्याला कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. तुम्ही पाहू शकता की, आई-बाबांचा हात हातात धरून कॅप्टन लेक अगदी अभिमानानं बसला आहे. पण, आई-बाबांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळताना दिसत आहेत. आई-बाबांनी आपल्याला यशस्वी होताना पाहाव, असं प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं; आज या लेकाचं तेच स्वप्न पूर्ण झालं आहे.
तू लकी आहेस मित्रा तुझं यश बघायला तुझे आई-वडील आहेत (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, आधी लेकाला टिळा लावून त्याचे स्वागत करतात. त्यानंतर अनेक जण स्टेजवर आदित्यचं कौतुक करतात. त्यानंतर आजीचा फोटो स्क्रीनवर आल्यावर आदित्य भावूक होताना दिसतो. त्यानंतर कुटुंबातील सगळ्या स्त्रिया मिळून त्याचं औक्षण करतात. मग कॅप्टनच्या गोष्टी अधोरेखित करणारा केकसुद्धा आणला जातो. अशा प्रकारे लेक कॅप्टन झाल्याचा आनंद साजरा केला जातो. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @balu_shet_1111 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आपलं मूल आपल्यापेक्षा मोठं व्हावं हे फक्त आई-वडिलांनाच वाटतं”, “तू लकी आहेस मित्रा! तुझं यश बघायला तुझे आई-वडील आहेत. पण, माझं यश बघायला माझे वडील आता नाहीत. नुकतंच त्यांचं निधन झालं”, “मरेपर्यंत त्यांचे ऋण फेडत राहावं आणि यशस्वी होऊन त्यांचं नाव मोठं करावं हेच आपलं आयुष्य”, “आदित्य आई-वडिलांच नाव मोठं केलंस… आई-वडिलांना भरून पावल्यासारखं झालं असेल… त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल… या जगात फक्त आई-वडिलांनाच असं वाटतं की, आपल्या मुलांनी आपल्यापेक्षा मोठं व्हावं… आई-वडील कधीच आपल्या मुलाविषयी चुकीचा विचार करीत नाहीत… आदित्य तुझं खूप खूप अभिनंदन”, “आज मुलगा म्हणून जिंकलास” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.