Viral Video: कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असेल, तर त्याच्या उपचारापासून ते तिची तब्येत ठीक होईपर्यंत घरातील प्रत्येक सदस्याला तिची चिंता असते. तसेच जर हा आजार कर्करोग असेल, तर कुटुंबातील सदस्यांना स्वतःसह रुग्णालाही धीर द्यावा लागतो. रुग्णांबरोबरच कुटुंबातील सदस्यांना हॉस्पिटलमधील महागडी बिले भरताना आर्थिक संकटाला आणि तर रुग्णांना होणारा त्रास पाहून भावनिक समस्यांना सामोरे जावे लागते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये कर्करोगाशी झुंज देणाऱ्या चिमुकलीची गोष्ट एका आईने सांगितली आहे.

व्हायरल व्हिडीओत चिमुकलीचा प्रत्येक दिवसाचा प्रवास शूट करण्यात आल्याचे दाखविले आहे. चिमुकलीला बरे वाटण्यासाठी वैद्यकीय प्रक्रियेतून जातानाचा प्रवास दाखविण्यात आला आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यापासून ते अगदी चांगले उपचार घेण्यापर्यंतचा प्रत्येक क्षण आणि यादरम्यान होणारा कुटुंबाच्या भावनांचा चढ-उतार या व्हिडीओत पाहायला मिळत आहे; जे पाहून तुमचे डोळे नक्कीच पाणावतील.

हेही वाचा…‘या’ आलिशान कारमधून वडापाव विकणार का ‘वडापाव गर्ल’ ? नेमकं प्रकरण काय; पाहा व्हायरल VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिल्यनंतर तुमच्या लक्षात आले असेल की, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या रुग्णाला कुटुंबीयांची साथ मिळणे किती महत्त्वाचे असते ते. त्यांची साथ असेल, तर रुग्णाला बळ आणि आशा मिळते. याबाबतचे उत्तम उदाहरण व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. कर्करोगाशी झुंज देणारे चिमुकलीचे आई-बाबा आणि तिचा लहान भाऊ तिच्या कठीण काळात तिला प्रेम देत कशी साथ देतात हे सर्व या व्हिडीओत दाखविण्यात आले आहे.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ @thekristinexy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. चिमुकलीच्या आईने हा व्हिडीओ संकलित केला आहे; ज्यात कर्करोगापूर्वी आणि कर्करोगानंतरचे तिचे आयुष्य कसे आहे हे दाखविले आहे. हा व्हिडीओ संकलित करताना आईचाही कंठ दाटून आला आहे आणि तिने कॅप्शनमध्ये आपल्या लेकीबद्दल भावूक होऊन प्रेम व्यक्त केले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुकली लवकर बरी होऊ देत, अशी प्रार्थना करीत आहेत. याआधीसुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात कर्करोगाशी झुंज देणाऱ्या चिमुकलीला दोन आठवड्यांनी भेटताच तिच्या भाऊ-बहिणीचे अश्रू अनावर झाले होते. तर, आज आपल्या लेकीला कर्करोगाशी लढताना पाहून एका आईने सोशल मीडियाचा आधार घेत आपले मन मोकळे केले आहे.