Viral Video : मुलाला औषध पाजण्यासाठी आईने केला हटके जुगाड; मुलाची रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती गोड…!’

व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला औषध देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मूल आधी आईच्या जाळ्यात अडकते.

Viral Video Mother tries hard to give medicine to child
लहान वयात मुलांना सहसा औषध आवडत नाही. (Photo : Instagram/@discovery.engenharia)

इंटरनेटच्या जगात देसी जुगाडच्या व्हिडीओची कमी नाही. दररोज काही ना काही देसी जुगाडचे व्हिडीओ लोकांना आश्चर्यचकित करतात. अशा परिस्थितीत आई कशा मागे राहतील? आई ही आई असते, मुलांच्या सुरक्षेसाठी तिला जे काही करावे लागेल ते ती करते. सोशल मीडियावर आईचे प्रेम आणि अप्रतिम जुगाड या व्हिडीओंनी लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. वास्तविक, गेल्या अनेक दिवसांपासून आईच्या देसी जुगाडशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला औषध देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मूल आधी आईच्या जाळ्यात अडकते. पण जेव्हा त्याला कळते तेव्हा तो खूप मजेदार प्रतिक्रिया देतो.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका आईला आपल्या मुलाला औषध द्यावं लागत आहे. लहान वयात मुलांना सहसा औषध आवडत नाही. व्हिडीओतल्या मुलाच्या बाबतीत अगदी तसंच आहे. तो औषध प्यायलाच मागत नाही. तेव्हा त्याची आई जरा डोकं लावून ज्युसचा पॅकेट कापते आणि त्यात औषधाची बाटली बसवते. त्यात ती स्ट्रॉही टाकते. मूल आईच्या जाळ्यात अडकते. तो आनंदाने येतो आणि ज्यूस म्हणून औषध घेतो आणि पितो.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

डोकं नसणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या काय आहे या Viral Photo मागील सत्यता

ज्यूस पित असताना मुलाच्या लक्षात येते की हे ज्यूस नसून काही तरी वेगळेच आहे. तो लगेचच तोंडातील स्ट्रॉ काढून मागे होतो. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघण्यासारखे आहेत. मुलाची प्रतिक्रिया लोकांना खूप आवडली. हा व्हिडीओ आतापर्यंत ३४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला ९७ हजारांहून अधिक लोकांनी लाइकही केले आहे. तसेच कमेंट सेक्शनमध्ये लोक आईच्या जुगाडाचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video mother tries hard to give medicine to child seeing the child reaction you too will say how sweet pvp

Next Story
महिलेने एकाचवेळी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच मुलांना दिला जन्म; हॉस्पिटलमधील कर्मचारीही झाले हैराण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी