Viral Video Mouse Steals Vada During Pooja : २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन झाले. सात दिवसांनी म्हणजेच २ सप्टेंबर २०२५ रोजी बाप्पांचे विसर्जन होईल. यादरम्यान आपण बाप्पांना त्यांचा आवडता मोदक, त्यांचे आवडीचे फुल जास्वंद अर्पण करतो आणि वाहन उंदीरची पूजा देखील करतो. गणपती बाप्पांचे वाहन म्हणून उंदीर या प्राण्याला विशेष महत्व आहे. तर आज गणेशोस्तवादरम्यान एका उंदराचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो पाहून तुम्हाला हसू आवरल्याशिवाय राहणार नाही.
कल्याणी या इन्स्टाग्राम युजरने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडीओच्या सुरवातीला विविध पदार्थांनी भरलेलं एक ताट दिसते आहे. कदाचित हे ताट नैवैद्यासाठी तयार केलेले असते; ज्यामध्ये वडे सुद्धा असतात. पण, बघता बघता अचानक तटाजवळ एक छोटा उंदीर येतो आणि ताटातील, त्याच्या वजनाच्या जवळजवळ दुप्पट वडा खेचून ताटाबाहेर आणून ठेवतो आणि कोणी बघण्याआधी अगदी वेगात तिथून घेऊन जातो. हा मजेशीर प्रसंग घरात उपस्थित असणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीच्या मोबाईलमध्ये नकळत शूट झाला आहे.
देवाने त्याच्या सहकाऱ्याला अन्न घेण्यासाठी पाठवले… (Viral Video)
गणपती बाप्पाला दर दिवशी नैवद्य दाखवला जातो आणि मग त्यानंतर घरातील मंडळी जेवायला सुरुवात करतात. पण, नैवद्य दाखवताना व्हिडीओतील कुटुंबाला काहीतरी अनोखं पाहायला मिळालं. उंदीर चक्क तटाजवळ येऊन वडा घेऊन गेला. सहसा उंदीर रात्री घरात शिरतात आणि मग त्यांच्या अन्न-पाण्याच्या शोधात असतात. पण, गणेशउत्सवादरम्यान नैवैद्याच्या ताटातून उंदराने वडा चोरून नेल्यामुळे सगळेच जण या गोष्टीला सकारात्मकतेने घेताना दिसत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा बघाच…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kalyani99195 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा हा मजेशीर प्रसंग पाहून थक्क झाले आहेत आणि गणेशोस्तव व गणपती बाप्पाचे वाहन उंदीर असा संदर्भ जोडून मजेशीर कमेंट्स करू लागले आहेत. “देवाने त्याच्या सहकाऱ्याला अन्न घेण्यासाठी पाठवले,” “गणपती बाप्पाचा उंदीर देखील वडा खाण्यापासून स्वतःला थांबवू शकला नाही” ; आदी कमेंट्स तर काही जणांना विचित्र वाटले आणि “ही घटना अस्वच्छ आहे”, ” उंदीर अन्नाजवळ येण्याबद्दल चिंता व्यक्त केली” तर काहींनी असा प्रश्नही विचारला की, जर अशी घटना गणेश चतुर्थीऐवजी इतर दिवशी घडल्या असत्या तर काय होईल” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसले आहेत.