Women Dance On Reshamachya Reghani Song : गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पाहणे, त्यात सहभागी होणे आणि त्यात मनोसोक्त नाचणे म्हणजे मुंबईकरांसाठी स्वर्गसुख असते. गणेशोत्सावाची खरी मजा ही मुंबईत म्हणजे प्रामुख्याने लालबाग-परळ या भागात पाहायला मिळते. गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या रूपात, उंच मुर्त्या पाहणाऱ्यांची इथे गर्दी इथे असते. आगमन सोहळ्याचे वेळापत्रक पहिले की त्यादिवशी उत्सुक मुंबईकर तिथे जाऊन पोहचतोच आणि आगमन सोहळ्याचा भरपूर आनंद घेतो. तर आगमन सोहळ्यात नाचणाऱ्या एका आजीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
आगमन सोहळ्यात ढोल, ताशा, बँजोच्या तालावर सगळी मंडळी नाचण्यात मग्न असतात. अशातच रविवारी खेतवाडीचा राजा आणि काळाचौकीचा महागणपतीचे आगमन झाले. यादरम्यान अनेक गणेशभक्तांचे व्हिडीओ व्हायरल झाले. यादरम्यान आगमन सोहळ्यात नाचताना एका आजीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये बँजोच्या सहाय्याने ‘हात नगा लावू माझ्या साडीला’ हे गाणे वाजवले जाते आहे. तर याच गाण्यावर आजी मनोसोक्त डान्स करताना दिसल्या आहेत.
आयुष्याचा प्रत्येक क्षण मनमुराद जगा (Viral Video)
काही जण वय वाढत जाते तसतसं अनेक गोष्टी करायला लाजतात किंवा अगदी सोडून देतात आणि ‘आता या वयात कुठे करणार’ असे सहज म्हणून जातात. पण, वय हा फक्त एकदा आकडा असतो. त्याचे प्रात्यक्षिक व्हिडीओत पाहायला मिळाले आहे. आजी कशाचीही पर्वा न करता अगदी मनापासून आगमन सोहळ्याचा आनंद घेताना दिसत आहेत. तिथे उपस्थित एका युजरने हा खास क्षण पाहून ‘आगमनात हा अनुभव आज आला… येईल तो दिवस आनंदात जगवा’ असा मजूकर व्हिडीओवर दिला आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @k_karan_cha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘आनंद हा असा हवा’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा खुश झाले आहेत आणि “सुंदर. बाप्पा नक्कीच खुश झाला असेल”, “आपली संस्कृती इतकी सुंदर असण्याचे हेच कारण आहे. देव तुला दीर्घायुष्य देवो. राहीले काही छपरी लोक जे आपल्या आगमन आणि विसर्जन सोहळ्याला येण्यारे , त्यांना ही रील दाखवा म्हणजे रील टू रिॲलिटी काय हे समजेल.एक लालबाग परळकर”, “आज मुंबईचे सण संस्कृति विशेषतः गणेशोत्सव एवढे समृध्द आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या मराठी लोकांमुळे”, “आयुष्य खुप क्षणभंगुर आहे म्हणून प्रत्येक क्षण मनमुराद जगायचा”, “जगायचं राहून नाही गेलं पाहिजे” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.