Viral Video: आयुष्य जगत असताना माणूस अनेक स्वप्ने पाहतो आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो. आपल्या कुटुंबीयांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी धडपड करीत असतो आणि त्या दिशेने वाटचाल करीत असतो. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथे एका १२ वर्षांच्या मुलाचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

तर ही गोष्ट नागराज या १२ वर्षांच्या मुलाची आहे; ज्याचे आयएएस अधिकारी बनण्याचे स्वप्न असते. चिमुकला बंगळुरूच्या झोपडपट्टीत राहतो आणि सध्या सहावी इयत्तेत शिकत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची पुस्तके वाचणे हा नागराजचा छंद आहे आणि त्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. घर बांधणे, आपल्या आजूबाजूला संघर्ष करणाऱ्या लोकांना मदत करणे आणि उपाशीपोटी लोकांना अन्न देणे ही या १२ वर्षांच्या चिमुकल्याची महत्त्वाकांक्षा आहे. एकदा पाहा हा व्हिडीओ.

हेही वाचा…अरे बापरे! जंगल सफारी करताना गाडीसमोर आला सिंह अन् पुढे जे घडलं… पाहा थरारक VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, नागराजने आपल्या लहान घराबद्दल कोणतीही खंत व्यक्त केली नाही. कारण- तो एक दिवस खूप मोठा होणार असा त्याचा विश्वास आहे. चिमुकला पुढे म्हणताना दिसत आहे की, मी खूप आनंदी आहे. मी जेव्हा मोठा होईल तेव्हा मोठं घर घेईन. युजरने चिमुकल्याला विचारले की, भविष्यात तुला काय बनायचं आहे ? तेव्हा मोठं झाल्यावर ‘आयएएस अधिकारी’ (IAS Officer) बनणार आहे, असे तो या व्हिडीओत सांगताना दिसत आहे. तसेच चिमुकल्याला बुद्धिबळ खेळात प्रथम क्रमांक आहे; तर अनेक प्रमाणपत्रेही त्याला मिळाली आहेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @abrokecollegekid या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मोहम्मद आशिक नावाच्या या सामाजिक कार्यकर्त्याने चिमुकल्याची ही गोष्ट सगळ्यापर्यंत पोहोचवली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी चिमुकल्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी त्याला भरपूर शुभेच्छा देताना दिसत आहेत आणि हा हृदयस्पर्शी व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.