दिवाळीची सुरुवात झाली आणि कुठे रांगोळीची आरास तर कुठे फटाक्यांचा धुमधडाका सुरू झाला. गेला आठवडाभर दिवाळीचा उत्साह देशभर पाहायला मिळाला. फराळापासून सुरू झालेला दिवस, रात्री फटाके फोडण्यावर येऊन संपतो. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फटाके फोडण्याचा आनंद लुटतात.

अनेक जण फटाके फोडताना दरवर्षीच नवनवीन स्टंट करत असतात. हे स्टंट कधीकधी त्यांच्याच अंगलट येतात. कधी हातात घेऊन फटाका फोडणं, तर कधी कोणत्यातरी भांड्यात फटाका लावणं असे स्टंट सुरूच असतात. पण, यामुळे अनेकदा अपघात होतो आणि लोकं जखमी होतात, तर काहींच्या जीवाला धोकादेखील निर्माण होतो. परंतु, तरीही मजा मस्ती म्हणून काही जण अशी स्टंटबाजी दरवर्षी करतच असतात आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतानादेखील आपण पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण चक्क त्याच्या पायांच्या मध्ये फटाका फोडताना दिसत आहे.

हेही वाचा… ड्रममध्ये फटाका लावल्यानंतर काय झालं पाहा! VIDEO पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक तरुण भलताच स्टंट करताना दिसत आहे. दिवाळीतील रॉकेट त्याने बरोबर पायांच्या मधोमध लावला आहे. रॉकेट पायामध्ये ठेवून तो त्याने पेटवला आहे. रॉकेट पेट घेताच तो तरुणाच्या अंगावर उडतो आणि स्टंटच्या नादात अंगावर चटके लागताच तरुण रॉकेट लगेच सोडून देतो.

हा व्हायरल व्हिडीओ @akram_rana_0001 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल ६.९ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… भरवर्गात त्यानं तिला…, शाळेत विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही तर हद्दच…”

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत विचारलं, “माझा फक्त एकच प्रश्न आहे की, असं करायचं तरी का?” तर दुसऱ्याने “खूपच डेरिंगबाज माणूस आहेस” अशी कमेंट केली. तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अशी रील बनवा, ज्याची कॉपी कोणीच करू शकत नाही.”

हेही वाचा… बापरे! इमारतीच्या भिंतीवर आपटून नंतर पायाने…, पाहा कशी बनवली जाते सोनपापडी, VIDEO होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात अनेक जण असे विचित्र स्टंट करताना दिसतायत.