गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान देशात काय परिस्थिती आहे हे सगळ्याचं ठाऊक आहे. आपण रोज सोशल मीडियावर या संदर्भातील असंख्य फोटो, व्हिडीओ बघत आहोत. हृदय पिळवटून टाकणारे ते फोटो आणि व्हिडीओ आहेत. आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातून बाहेर पडण्यासाठी हजारो हताश अफगाणी काबुल विमानतळावर जमा झाले. विमानतळाच्या आणि आजूबाजूच्या अहवालांनुसार, हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूला अनेक लोक आहेत. रविवारी गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर उतरलेल्या अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आलेल्यांमध्ये अनेक मुले होती. यातल्याच एका छोट्या बाळाचा आणि लहान मुलीचा एक छोटासा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
एक लहान बाळ आपल्या आईच्या मांडीवर बसले आहे. तेव्हा एक लहान मुलगी बसलेल्या लोकांभोवती आनंदात फिरत असताना त्या बाळाजवळ येते. आणि त्या बाळाला हसत हसत पप्पी देते. हा सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान शेअर केला जात आहे. बुरख्या परिधान केलेली एक महिला तिच्या बाळासोबत अफगाणिस्तानातून आल्यावर आरटी-पीसीआर चाचणीची वाट पाहत तिथे बसली होती. तेव्हाच हा व्हिडीओ टिपण्यात आला आहे.
निर्वासितांमध्ये अनेक मुले देखील दिसली, त्यापैकी काहींच्या पाठीवर बॅग होती, काहींनी त्यांच्या पालकांचा हात धरला होता. काही मुले हसत, छान स्मित करताना दिसली. तालिबानने काबूल आणि अफगाणिस्तानच्या बहुतांश भागांवर ताबा मिळवल्यानंतर काबूलमधून भारताने ३०० हून अधिक लोकांना बाहेर काढले आहे. “काही महिन्यांचे बाळ देखील पासपोर्टशिवाय आयएएफच्या विशेष विमानात भारतात उतरले आहे.” असे निर्वासन समन्वय अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले.सोमवारी नुकत्याच झालेल्या निर्वासनात, भारत सरकारने पासपोर्ट नसलेल्या लहानमुलांसह भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानात अफगाणस्थित शीख कुटुंबालाही बाहेर काढले.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणि अन्य अफगाणिस्तानातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताला काबूलमधून दररोज दोन उड्डाणे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. उड्डाण मार्गांवरील सुरक्षिततेच्या चिंतांमुळे भारत ताजिकिस्तान आणि कतारमधील दुशान्बेमार्गे आपल्या नागरिकांना विमानाने हलवत आहे. अफगाणिस्तान केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रविवारी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ८७ भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे विमान ताजिकिस्तानहून नवी दिल्लीत उतरले आहे.
#WATCH | An infant was among the 168 people evacuated from Afghanistan’s Kabul to Ghaziabad on an Indian Air Force’s C-17 aircraft pic.twitter.com/DoR6ppHi4h
— ANI (@ANI) August 22, 2021
तुम्हाला काय वाटत या व्हिडीओबद्दल?