Emotional Father in Daughters Wedding Viral Video: लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा प्रसंग असतो. मग लग्नातला सगळ्यात भावूक करणारा क्षण म्हणजे जेव्हा वधू आई-वडिलांचा निरोप घेते आणि पतीसोबत तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी निघते तेव्हा. लग्नातील निरोपाचा क्षण प्रत्येक मुलीसाठी आणि तिच्या वडिलांसाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय आणि भावनिक वेळ. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये वधू वडिलांना मिठी मारून अश्रूंनी गदगदून रडताना दिसते. तिच्या डोळ्यांतील वेदना पाहून आसपास उपस्थित प्रत्येकाच्या नजरा पाणावल्या. या अश्रूंमध्ये एक वेगळीच भावना होती. घराच्या आठवणी, वडिलांचा हात सोडण्याचं दु:ख, आणि एक नवीन प्रवासाची सुरूवात. मात्र, या भावनिक क्षणात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते नवरदेवाने. लग्नमंडपात नवरदेवानं काय केलं. जाणून घेऊयात…
लग्नानंतर कोणत्याही मुलीसाठी तिच्या वडिलांपासून लांब जाणं हा सगळ्यात भावनिक क्षण असतो. खरं तर हा फक्त मुलीसाठी नाही, तर तिच्या वडिलांसाठीही तो भावविव्हल करणारा क्षण असतो. केवळ वधू आणि तिचं कुटुंबच नाही तर तिथे उपस्थित असलेले इतर नातेवाईक आणि पाहुणेदेखील मुलीच्या निरोपाच्या क्षणी भावनिक होतात. एखादी व्यक्ती कितीही भावनिकदृष्ट्या मजबूत असली तरी निरोपाच्या वेळी ती भावनिक होते. सध्या इंटरनेटवर वधूच्या निरोपाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये वधू तिच्या वडिलांना सोडून जाण्याच्या दु:खामुळे मोठ्याने रडताना दिसत आहे. तथापि, ती इतकी रडत आहे की, व्हिडीओ पाहिल्यानंतर, इंटरनेटवरील लोक भावनिक झालेत.
आजकाल इंटरनेटवर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. निरोपाच्या वेळी वधू तिच्या वडिलांना मिठी मारून मोठ्याने रडत असल्याचे दाखवले आहे. तिथे उपस्थित असलेले इतर नातेवाईकही भावनिक होतात. वधूचे सांत्वन करण्याबरोबरच ते त्यांचे अश्रूही पुसत आहेत. या सगळ्यामध्ये नवरदेवही रडताना दिसत आहे.
indiaprogram नावाच्या वापरकर्त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निरोपाच्या वेळी वधू तिच्या वडिलांना मिठी मारताना रडताना दिसत आहे. दुसरीकडे वधूला रडताना पाहून वराचे डोळेही ओले झाले. तो भावनिकही दिसतोय. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला व्हिडीओ काही क्षणांतच व्हायरल झाला. व्हिडीओ पोस्ट झाल्यापासून लाखो वापरकर्त्यांनी तो पाहिला आहे. व्हिडीओला ६५ हजारांहून अधिक वापरकर्त्यांनी लाईक केले आहे. व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये वापरकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत.
येथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “जर त्यानंही आपल्या बहिणीला निरोप दिला असता, तर त्याला बहीण गमावण्याचं दुःख कळलं असतं.” दुसऱ्या यूजरने म्हटलं आहे, “एखाद्याला असा मुलगा फक्त मोठ्या नशिबानं मिळतो.” तिसऱ्या यूजरने म्हटलं आहे, “त्यानंही आपल्या बहिणीला लग्नाप्रसंगी निरोप दिला असेल, म्हणूनच त्याला वेगळं होण्याचं दुःख कळतं.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.