Video Shows little Boy Rests On Strangers Lap In Metro : सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये सीटवरून भांडण, नियमांचे उल्लंघन, कधी रील्स बनवणे तर कधी अगदी अश्लील चाळेसुद्धा प्रवासादरम्यान दिसून येतात. तर आज दिल्ली मेट्रो एका खास कारणाने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण, मेट्रोतील आजचा व्हिडीओ पाहून तुमचा संताप न होता, तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल एवढं तर नक्की…

लहान मुलांना कधी, कुठे भूक लागेल, कधी त्यांना झोप येईल हे काही सांगता येत नाही. तर आज अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये चिमुकल्याला अजिबात झोप आवरत नसते आणि आई त्याला सतत उठवण्याचा प्रयत्न करत असते. पण, चिमुकला काही केल्या ऐकायला तयार नसतो. तो डोळे बंद करूनच आपल्याला कुठे डोकं टेकवून झोपायला मिळतंय का याची वाट पाहत असतो. पण, आईचा त्याला उठवण्याचा प्रयत्न सुरूच असतो; जो पाहून तुम्हालाही हसायला येईल.

काकांसाठी एक लाईक तर बनतोच (Viral Video)

कधीकधी लहान मुलांची मस्ती, रडणे बघून आजूबाजूचे प्रवासी कंटाळून जातात. पण, आज व्हायरल व्हिडीओतील प्रवाशाने सगळ्यांचे मन जिंकले आहे. चिमुकल्याला झोप आवरत नसते, त्यामुळे तो बाजूला बसणाऱ्या एका अज्ञात प्रवाशाच्या मांडीवर झोपून जातो. हे पाहून आई त्यांना त्रास देऊ नकोस असे म्हणते. पण, अज्ञात प्रवासी राहूदेत म्हणत चिमुकल्याचे डोकं आपल्या मांडीवर पुन्हा ठेवतो, जे पाहून आईच्याही चेहऱ्यावर हसू येते. एकदा तुम्हीसुद्धा बघा हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

View this post on Instagram

A post shared by @ghaziabad9.0

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ghaziabad9.0 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘मेट्रो’ अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून प्रवाशाचे कौतुक करत आहेत आणि “काकांसाठी एक लाईक तर बनतोच”, “ते फक्त बस आणि ट्रेनमध्ये झोपतात आणि घरी पोहोचल्यावर परत खेळण्यास सुरुवात करतात”, “त्याची आई त्याला झोपू का देत नाही”, असा प्रश्नसुद्धा अनेक नेटकरी कमेंटमध्ये विचारताना दिसत आहेत…