Video Shows Boy Use Mom Saree To Rescue Ball : लहान मुले आणि त्यांची मस्ती याला कोणताच नेम नसतो. आपण थोडंसं जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तरी ते काय करून बसतील हे काही सांगता येत नाही. अनेकदा क्रिकेट खेळताना कोणाची काच फोडतील, तर कधी इतरांना इजा पोहचवतील. तर कधी खेळता-खेळता बॉल हरवतील आणि मग जीवाची बाजी लावून तो बॉल शोधून काढतील. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये चिमुकल्याने जबरदस्त जुगाड केलेला दिसतो आहे.

व्हायरल व्हिडीओ गावाकडचा आहे. खेळता-खेळता चिमुकल्याचा बॉल विहरीत पडतो. विहरीत उतरून बॉल काढायचा तरी कसा यासाठी तो जबरदस्त जुगाड शोधतो. चिमुकला आईची साडी घेऊन येतो. त्यानंतर विहरीतून पाणी काढतात अगदी तशीच पद्धत बॉल काढण्यासाठी वापरतो. विहिरीतलं पाणी काढण्यासाठी आपण बादली साडीत बसतो आणि मित्राला साडी खाली सोडायला सांगतो. मित्राने साडी हळूहळू सोडल्यावर तो विहरीच्या तळाशी जातो. त्यानंतर हरवलेला बॉल शोधतो. मित्र वरून साडी खेचतो आणि मग अलगद चिमुकला वर येतो.

३० रुपयांचा बॉल आणि ५०० रुपयांची साडी (Viral Video)

चिमुकल्याचा हा जुगाड भन्नाट असला तरीही काही सेकेंदासाठी व्हिडीओ पाहून तुम्हालाही चिंता वाटेल. कदाचित चिमुकल्याला वर खेचताना साडी फाटली असती किंवा मित्राचा तोल गेला असता तर होत्याच नव्हतं झालं असतं एवढं तर नक्कीच. पण, व्हायरल व्हिडीओत तसं काहीच नाही झालेला नाही. विहरीत पाणी नसल्यामुळे चिमुकल्याचा हा जुगाड यशस्वी झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा चिमुकल्याचा भन्नाट जुगाड व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @AkshayUnfiltered09 या युट्युब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “बॉल काढण्यासाठी आईच्या साडीचा केला उपयोग. ३० रुपयांचा बॉल आणि ५०० रुपयांची साडी ” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी कमेंटमध्ये पोट धरून हसत आहेत आणि “हा चिमुकला नक्की बिहारचा असणार”, “जे कोणी करू शकत नाही ते भारतातील लोकं करतात”, “त्याचा मित्रावर किती विश्वास आहे बघा” ; आदी अनेक कमेंट्स नेटकरी करत आहेत.