Fact Check Of German FM’s Video : लाइटहाऊस जर्नलिझमला, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होणारा एक व्हिडीओ आढळला. ज्यात दावा केला जात होता की, जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक भारतात आल्या आहेत. पण, त्यांचे स्वागत करण्यासाठी कोणतेही अधिकरी तिथे उपस्थित नव्हते. पण, तपासादरम्यान आमच्याकडे वेगळीच माहिती समोर आली.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @Qabid_al_farooq ने त्याच्या प्रोफाइलवर व्हिडीओ (Video) शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये, ‘जेव्हा जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री भारतात येतात, पण त्यांचे स्वागत करायला कोणीच नव्हते’; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

Terrifying Video of father saving his children life from accident video went viral on social media
हा VIDEO पाहून कळेल आयुष्यात वडिलांचं असणं किती गरजेचं, बापाने मरणाच्या दारातून लेकराला आणलं परत, पाहा नेमकं काय घडलं
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

इतर युजर्सदेखील त्यांच्या प्रोफाइलवर हा व्हिडीओ (video) शेअर करत आहेत.

हेही वाचा…JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

तपास :

आम्ही व्हिडीओवरून (Video) मिळवलेल्या कीफ्रेमवर शोध सुरू केला. या दरम्यान आम्हाला १९ जानेवारी २०२४ रोजीचा GIC दक्षिणपूर्व आशिया हँडलद्वारे पोस्ट केलेला एक्स (ट्विटर)वरील व्हिडीओ आढळला.

त्यानंतर आम्ही पोस्टमध्ये नमूद केलेल्या वरील माहितीवर शोध सुरू केला. आम्हाला जर्मन इन्फॉर्मेशन सेंटर साऊथेस्ट आशियाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या प्रतिमादेखील आढळल्या. पोस्टमध्ये त्यांच्या कार्यक्रमांबाबत सांगण्यात आले होते, पण त्यात भारताचा उल्लेख नव्हता.

https://www.facebook.com/share/p/17LdWh92mL/

dw.com च्या एका लेखात फोटोला कॅप्शन दिली होती की, जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक मलेशियाला भेट देणार आहेत.

https://www.dw.com/en/germany-strikes-balancing-act-in-southeast-asia/a-68000565

आम्हाला fotos.europapress.es वर त्यांचा विमानातून उतरतानाचा एक फोटोदेखील सापडला. त्यात कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, १२ जानेवारी २०२४ ला जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांचे क्वालालंपूर, मलेशिया येथील विमानतळावर आगमन झाले. फोटो : मायकेल कॅपलर/डीपीए. दिनांक: ०१/१२/२०२४.

https://fotos.europapress.es/actualidadinternacional/f5682886

यावरून हा व्हिडीओ भारताचा नसून मलेशियाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका आठवड्यापूर्वी EAM जयशंकर यांनी नवी दिल्लीत जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांची भेट घेतली.

२०२३ मध्ये भारताच्या भेटीदरम्यान ॲनालेना बेरबॉकसाठी रेड कार्पेट न लावण्यावरून वाद निर्माण झाला होता. पण, जर्मनीचे राजदूत फिलिप एकरमैन यांनी नंतर स्पष्टीकरण दिले आणि ‘भारतीय प्रोटोकॉलने उत्कृष्ट काम केले.’ तसेच ते पुढे म्हणाले की, जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांचे विमान दिल्लीत थोडे लवकर उतरले आणि तिने लाइन न घेता लगेच निघण्याचा निर्णय घेतला, ही संपूर्ण जर्मनची समस्या होती.

निष्कर्ष : एक्स (ट्विटर) वरील व्हायरल व्हिडीओत ‘जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांचे भारतात एअरपोर्टवर स्वागत करण्यात आलं नाही’ असा दावा करत असलेला व्हिडीओ खरंतर मलेशियाचा आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader