Video Shows Women Slap Man Inside Indian Railway : बस, ट्रेन असो किंवा अगदी मेट्रो गर्दीच्या ठिकाणी इतरांचा गैैरफायदा घेणारे अनेक जण असतात. त्यांच्या मस्तीमुळे इतरांना त्रास होतोच आणि संपूर्ण वातावरणही बिघडून जाते. त्यामुळे कधी कधी खिडकीजवळ बसायला नाही मिळाले तरी चालेल, पण प्रवासात आजूबाजूला बसणारी मंडळी चांगली असावी अशीच आपली इच्छा असते. तर आज अशीच एक घटना सोशल मीडियावर व्हायरल होते आहे, ज्यामध्ये लहान मुलीसमोर गैरवर्तन करणाऱ्याला महिलेने मारहाण केली आहे.
व्हायरल व्हिडीओत चिमुकलीसमोर गैरवर्तन करणाऱ्या तरुणाला महिलेने चांगलाच धडा शिकवला आहे. अप्पर सीटवर एक चिमुकली बसलेली असते. तिच्यासमोर एक तरुण चुकीच्या पद्धतीने बसून इकडे-तिकडे पाय पसरवत असतो . त्यानंतर तो जेव्हा सीटवरून खाली उतरतो तेव्हा महिलेला म्हणतो, ‘काकू एक मिनिट थांबा मला जाऊ द्या’, हे ऐकताच महिला ‘जर तू मुलीला हात लावलास तर मी तुला मारून टाकीन’ असे रागात म्हणते. हातातील घड्याळ काढते आणि त्याला कानाखाली मारायला सुरुवात करते.
अशा लोकांबरोबर असंच केलं पाहिजे (Viral Video)
तुम्ही अनेकदा प्रवासात पुरुषांना वाईट नजरेने बघताना, विचित्र हालचाली करताना पाहिले असेल. यामुळे अनेकदा आपल्यालाही अस्वस्थ वाटते, त्यामुळे अशा लोकांना वेळीच धडा शिकवणे योग्य असते. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, लहान मुलीसमोर चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे ट्रेनमधील महिला पुरुषाला कानाखाली मारते. हे सगळं बघून एक महिला जोरात म्हणते ‘अरे, तो मरून जाईल.’ यावर महिला, ‘तो मेला तरी चालेल, अप्पर सीटवर लहान मुलीसमोर बसून चुकीच्या पद्धतीने पाय पसरवणे योग्य आहे का? या लोकांमुळेच आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत’, असे रागात म्हणते. एकदा बघाच व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये घडलेली घटना नमूद केली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून ‘हेच हवं, योग्य वेळी योग्य ॲक्शन घेतली पाहिजे’, ‘अशा लोकांबरोबर असंच केलं पाहिजे’, ‘तो माणूस मद्यधूंद अवस्थेत आहे… या धाडसी महिलेने त्याला चांगला धडा शिकवला, हे पाहून मला खूप समाधान वाटले आणि त्याची बाजू घेणाऱ्या त्या मूर्ख महिलेलाही ट्रेनमधून बाहेर फेकून दिले पाहिजे’; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.