Viral Video : गाव आणि शहर यात खूप फरक आहे. गावाकडील राहणीमान, वातावरण, खाण्याच्या गोष्टी यात खूप वेगळेपण दिसून येते. गावात मोकळे माळरान, लांबच लांब रस्ते, हिरवीगार झाडं आणि विशेषत: मोकळी हवा अनुभवता येते. गावात गायी-गुरांनाही राहण्यासाठी विशेष जागा म्हणजे गोठा असतो, ज्यात ही जनावरं सुखाने राहतात. मात्र, शहरात फार वेगळे चित्र असते, तिथे तुम्हाला फक्त अरुंद रस्ते, माणसांची वर्दळ, ट्रॅफिक, रस्त्याच्या कडेला खुंटीला बांधलेल्या गाई, म्हशी आणि गल्लोगल्ली भटके श्वान दिसतील. या शहरातील असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण होईल. तसेच तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही, कारण यातील दृश्यचं अशी आहेत.

व्हायरल व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ संतापजनक आहे, कारण यात अरुंद रस्त्यावरील घराबाहेर गाय, म्हैस, उंटासह चक्क एका बिबट्याला एकाच ठिकाणी साखळदंडाने बांधलेले दिसत आहे. याशिवाय तिथे एका पिवळ्या रंगाची कारही उभी केलेली दिसतेय. हे दृश्य पाहिल्यानंतर लोक त्यावर विविध अंदाज बांधत आहेत. काही लोकांना वाटतेय की, कोणत्यातरी श्रीमंत व्यक्तीच्या घराजवळील हे दृश्य आहे. जिथे बाहेर रहदारी सुरु आहे, मात्र अशाठिकाणी बिबट्याला एखाद्या श्वानाप्रमाणे बांधून ठेवणे कितपत योग्य आहे सवाल उपस्थित केला जात आहे.

घराबाहेर बिबट्याला ठेवले साखळदंडाने बांधून

व्हिडीओमध्ये म्हैस, उंट, शेळ्या- मेढ्यांसह चक्क बिबट्याला एका अरुंद रस्त्याच्या कडेला साखळदंडाने बांधून ठेवलेले दिसतेय. हा रस्ता इतका विविध गोष्टींनी भरलेला आहे की, लोक याला प्राणीसंग्रहालय म्हणत आहेत. यामध्ये एका बाजूला गाय, म्हैस तर बाजूला उंट बांधलेला दिसतो. त्याच्या अगदी समोरच एक दुबळा बिबट्या साखळीने बांधलेला दिसतोय. पण, व्हिडीओतील दृश्य पाहिल्यास ते अजिबात प्राणीसंग्रहालय वाटत नाही, कारण तिथे आजूबाजूला अनेक लहान मुलं खेळताना आणि काही तरुण गप्पा मारत उभे असल्याचेही दिसत आहे. तसेच शहरात ज्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला कार पार्क केल्या जातात अगदी तशीच एक कार तिथे दिसते. त्यामुळे या दृश्याने लोक आश्चर्यचकित होत आहेत, तर अनेक जण संताप व्यक्त करत आहेत. कारण वन्यप्राण्यांना अशाप्रकारे जबरदस्तीने बांधून ठेवणे अमानवी कृत्य असल्याचे मत लोक व्यक्त करत आहेत.

Read More Trending News : उत्तर प्रदेशात मदरशातील शस्त्रांच्या कारखान्यावर पोलिसांची छापेमारी? मशीनग्ससह हजारो शस्त्र जप्त? Video चा २०१९ च्या घटनेशी संबंध काय? वाचा सत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ @viral_meme_only नावाच्या अकाउंटने इन्स्टावर शेअर केला आहे, ज्याला लाखो लोकांनी पाहिले आहे आणि त्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हे बेअर गिल्सचे घर असावे, त्यामुळेच इतके प्राणी दिसत आहेत.’ तर दुसऱ्याने लिहिले की, ‘तुम्ही काहीही म्हणा, प्राण्यांवर खूप अत्याचार केले जात आहेत.’ तिसऱ्याने लिहिले की, ‘हा व्हिडीओ पाकिस्तानचा असावा.’ याशिवाय इतर अनेक युजर्सनी देखील प्राण्यांना दिली जाणारी ही वागणूक अमानवी, असंवेदनशील आणि क्रूर असल्याची म्हणत आहेत.