Viral Video: आई आणि तिच्या लेकरांचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. अगदी जन्म दिल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत आई आपल्या मुलांना सांभाळते, त्यांचं रक्षण करते. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. अशा आई आणि लेकीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या एक वेगळा व्हिडीओ व्हायरल होतोय.

गेल्या काही वर्षापासून कॅन्सरच्या आजाराने अनेकांनी आपला जीव गमावला आहे. हा आजार सध्या झपाट्याने वाढत असून दररोज कॅन्सरच्या विळख्यात अडकणाऱ्या माणसांची संख्या वाढतंच चालली आहे. कॅन्सर हा आजार लवकर बरा होत नाही त्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. सोशल मीडियावर अनेकदा कॅन्सरबद्दलच्या, रुग्णांबद्दलच्या रील्स व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

व्हायरल व्हिडीओ (Cancer Girl Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुणी तिच्या आईच्या आणि आपल्या आजारपणामुळे ग्रीन टी प्यावी लागते असं हसत सांगताना दिसतेय. ती म्हणते, “मित्रांनो मला कॅन्सर आहे आणि माझ्या आईला शुगर आहे आणि दोघींपैकी कोणालाच साखर खायची नाही आहे ना चहा प्यायची आहे. म्हणून आम्ही ग्रीन टी मागवली आहे. आता त्रास हा आहे की, आम्ही ही चहा पिऊच शकत नाही. कारण ही खूप कडू आहे आणि बेचव लागते आहे. माझी आई तर नुसत्या शिव्याच देतेय. ४० मिनिटं झाली आम्ही ही चहा फक्त हातात घेऊन बसलो आहोत. ”

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ३.१ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “सलाम आहे तुम्हाला या परिस्थितीतही तुम्ही हसून आयुष्य जगत आहात,” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, असं जगायला खूप हिंमत लागते.” तर दुसऱ्याने “या ताईमध्ये खूप धाडस आहे, जीवन जगायला असंच धाडस लागतं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “दुःख आणि आनंद हे जीवनाचा एक भाग आहेत. आज दुःख असेल तर उद्या आनंद येईल. नेहमी आनंदी रहा.” तर एकाने “तुम्हाला देव लवकर बरं करो, ही प्रार्थना” अशी कमेंट केली.