Viral Video : मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मुंबईची लोकल ट्रेन म्हटले की गर्दी असतेच आणि या गर्दीत अनेकदा लोकल ट्रेन स्टेशनवरील अपघाताच्या घटनाही समोर येतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. मुंबईच्या वडाळा स्टेशनवरील ही घटना आहे. सध्या या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

हेही वाचा : Video: वडाळा रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली आली महिला, १ सेकंदाच्या फरकाने वाचले वृद्ध महिलेचे प्राण

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते की लोकल ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात एक वयोवृद्ध महिला प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये पडली तेव्हा तेथील टीसी सुधीर कुमार यांनी त्या वृद्ध महिलेला प्लॅटफॉर्मकडे ओढले आणि तिचा जीव वाचविला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हेही वाचा : दोन बायका फजिती ऐका ! दोघींच्या भांडणात नवऱ्याला पडला चपलांचा मार, Video पाहून….

साधना असे महिलेचे नाव असून टीसीचे नाव सुधीर कुमार मांझी आहे. सेंट्रल रेल्वेने या घटनेचा व्हिडीओ ट्वीट करीत याविषयी माहिती दिली.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी टीसीचे कौतुक करीत कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. यापूर्वीही असे अनेक लोकल ट्रेन अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर आले आहेत.

Story img Loader