सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये एक व्यक्ती माकडाला हटकत होता, त्यावर माकडाने चक्क व्यक्तीच्या अंगावर उडी घेऊन त्याला खाली पाडले. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना पोट धरून हसवत असताना आता एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मनाला भिडणारा आहे. तो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मित येईल.

व्हिडिओमध्ये एक श्वानाचे पिल्लू सशाबरोबर खेळत आहे. इतकेच नव्हे तर या पिल्लाने सशाची हुबेहुब नकल देखील केली आहे. श्वानाचे पिल्लू हुबेहुब सशासारखेच उड्या घेतोय. व्हिडिओत एक काळ्या रंगाचा ससा आहे. या सशामागून श्वानाचे गोंडस लहान पिल्लू उड्या मारत येतो. हे कळताच ससा देखील उड्या मारत पुढे जतो, तर ते पाहून पिल्लू देखील त्याच्याचप्रमाणे उड्या मारत पुढे जातो. नंतर ससा एक उंच उडी घेऊन पिल्लाच्या दिशेने पलटो, जणू काही पिल्लाला नकल न करण्याचा इशाराच त्याने दिला असावा.

(Viral video : माकडाला दगड मारणार होता माणूस, तेवढ्यात माकडाने जे केले ते पाहून असू आवरणार नाही)

यो दोन्ही मित्रांचा खेळतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. २.५ लाख लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे. ६१ लाखांपेक्षा अधिक युजर्सनी या व्हिडिओला बघितले आहे. श्वान आणि सशातील मैत्रीचे हे सुखद क्षण खरच आनंद देणारे आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रियांचा पाऊस होत आहे. युजरने पोस्टला कॅप्शने देत श्वान स्वत:ला ससा समजत असल्याचे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्वान हे मनुष्यांचे चांगले मित्र होतात. अनेक संकटात त्यांनी मनुष्यांची मदत केल्याच्या घटना घडल्या आहेत. स्वभावाने ते प्रेमळ असतातच पण ते कधी कधी हिंसक देखील होतात. त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेमुळे लष्कर देखील त्यांची मदत घेते. काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांशी दोन हात करताना झूम नावाचा श्वान गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याचे निधन झाले.