scorecardresearch

Premium

VIRAL VIDEO : सापाचे लागोपाठ वार आणि उंदराची अगदी ‘ब्रूस ली’ सारखी फाईट, पाहा कोणी मारली बाजी…

उंदीर आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. मुंगूस प्रमाणे उंदीर सुद्धा सापाचा जानी दुश्मन आहे. दोघांमधल्या या तगड्या झुंजीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहताना काही वेळासाठी आपण ॲक्शन फिल्म पाहतो की काय असा भास होऊ लागतो.

Snake-Attacks-On-Rat
(Photo: Instagram/ nature27_12)

Rat and Snake Fight : उंदीर आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. मुंगूस प्रमाणे उंदीर सुद्धा सापाचा जानी दुश्मन आहे. साप आणि मुंगूसाची लढाई तुम्ही बरीच पाहिली असेल. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो एका साप आणि उंदराची आहे. या दोघांमधली लढाई इतकी खतरनाक होती की हा व्हिडीओ पाहताना तुमची नजर हटणारच नाही. उंदराला पकडण्यासाठी सापाने थेट हवेत झेप घेतली. सापाच्या शिकारीतून कुणाचीच सुटका होत नाही, असंच तुम्हालाही वाटत असेल. पण थोडं थांबा. कारण या व्हिडीओमध्ये काही वेगळंच दृश्य दिसतंय. सापाचा सततचा वार या उंदराने इतक्या जबरदस्तपणे हाणून पाडलेत की तुम्ही सुद्धा हैराण व्हाल. या व्हिडीओमध्ये उंदीर अगदी ‘ब्रूस ली’ सारखी तगडी फाईट करताना दिसून येतोय. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर दररोज अनेक धक्कादायक व्हिडीओ पोस्ट होत असतात, जे पाहून धक्काच बसतो. सापांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण प्रत्येक लढाईत सापच जिंकेल असं होत नाही. यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. सापालाही तोडीस तोड उत्तर देणारे असतात याचा प्रत्यक्ष अनुभव देणारा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंदीर पकडण्यासाठी सापाने हवेत झेपावून कशी उडी मारली आहे. सापाने ज्या पद्धतीने उंदरावर हल्ला केला ते दृश्य खूपच भयावह आहे. सापाचा हल्ला पाहता आता उंदिराचा विषय संपणार असं वाटत असतानाच पुढे जे पहायला मिळतं ते हैराण करणारं आहे. साप लागोपाठ या उंदरावर वार करतो आणि त्याचा प्रत्येक वार उंदिर मोठ्या स्टाईलमध्ये हाणून पाडतो.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ajit pawar
“माझ्याकडील अर्थखातं पुढं टिकेल, नाही टिकेल सांगता येत नाही, पण…”, अजित पवारांचं विधान

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सांगा या व्हिडीओमधली बकरी भिंतीवर हवेत उडून गेली की चढून गेली ? अनेकजण गेले गोंधळून

या व्हिडीओमधल्या साप आणि उंदराची झुंज पाहून काही वेळासाठी आपण कोणती ॲक्शन फिल्म पाहतोय की काय असा भास होऊ लागतो. रात्रीच्या गडत अंधार सुरू असलेल्या झुंजीत उंदीर आपल्या दोन्ही पायांनी सापाला ढकलून पळून जातो. उंदराने ज्या प्रकारे हुशारी दाखवून त्याचा जीव वाचवला, त्याचे लोक कौतुक करत आहेत. या अनोख्या झुंजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘त्या’ एअर होस्टेसवरही चढला ‘पुष्पा’ फिवर, ‘सामी सामी’ गाण्यावर केला रश्मिकापेक्षाही भन्नाट डान्स

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीला घेण्यासाठी नवरदेव स्टेजवरून खाली आला, पुढे जे होतं ते पाहून तुम्ही म्हणाल, ‘किती क्यूट!’

हा व्हिडीओ nature27_12 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जेव्हा रेटनस्नेक हल्ल्याला उत्तर देण्याची गोष्ट असते तेव्हा वाळवंटातील कांगारू उंदीर सुद्धा त्यांची हुशारी दाखवतात” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. या झुंजीत उंदराची फाईट पाहून नक्की कोण बाजी मारतं हे जाणून घेण्यसाठी लोक उत्सुक झाले आहेत. या व्हिडीओला शेअर होऊन अवघे २४ तास देखील उलटले नाहीत तर आतापर्यंत या व्हिडीओला ९ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर लोक इमोजीद्वारे त्यांच्या प्रतिक्रिया देण्यात व्यस्त आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2022 at 17:07 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×