Viral Video : सोशल मीडियाच्या दुनियेत दररोज असंख्य घटना समोर येतात. त्यात काही घटना गंभीर स्वरूपाच्या असतात, की ज्याने मोठं वादळ उठतं. अलीकडेच असाच एक प्रसंग चर्चेत आला आहे, तसेच सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने पसरला असून लोक या घटनेवर संताप व्यक्त करत आहेत. आजच्या काळात कुठलाही छोटासा प्रकार असो किंवा मोठा, तो मोबाईल कॅमेऱ्यांतून थेट लोकांपर्यंत पोहोचतो. हाच प्रकार या व्हिडीओमुळे समोर आला आहे.
टर्कीतील एका नामांकित टेक कंपनीचे सीईओ हक्की अल्कान आणि त्यांचा कर्मचारी सामेट जानकोव्हिक यांच्यात ऑफिसमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद एवढा चिघळला की अचानक संतापाच्या भरात सीईओने जवळची फुलदाणी हातात घेतली आणि सरळ कर्मचाऱ्यावर फेकली. ती थेट त्याच्या डोक्यावर आदळली आणि त्याला किरकोळ जखम झाली. हा प्रकार केवळ ऑफिसमधला वाद राहिला नाही, तर आता कायदेशीर स्तरावर पोहोचला आहे. या व्हिडीओमुळे एकीकडे सीईओवर टीका होत आहे तर दुसरीकडे कर्मचारी आपली बाजू सोशल मीडियावर स्पष्टपणे मांडत आहे.
पाहा व्हिडिओ
या घटनेचं सविस्तर वर्णन करणारा व्हिडीओ बाहेर आल्यानंतर गोष्ट अधिक स्पष्ट झाली आहे. शिफ्टडिलिट नावाच्या टेक न्यूज आउटलेटमध्ये हक्की अल्कान आणि कर्मचारी सामेट जानकोव्हिक यांच्यात वाद सुरू झाला. चर्चेचा विषय होता, कोणता कंटेंट प्रकाशित करायचा. साध्या वादातून सुरुवात झाली, पण लवकरच वातावरण तापलं आणि दोघेही जोरदार वाद घालू लागले. अचानक अल्कान यांनी जवळच असलेली फुलदाणी उचलली आणि संतापाच्या भरात ती सरळ जानकोव्हिकच्या डोक्यावर फेकली. यामध्ये जानकोव्हिकला किरकोळ जमख झाली. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की, फुलदाणी लागल्यावर जानकोव्हिक रागाने अल्कानकडे धावत जातात, पण तिथे उपस्थित असलेले इतर सहकारी लगेच त्यांच्यामध्ये जाऊन त्यांना वेगळं करतात. या घटनेनंतर जानकोव्हिक संतापून थेट हॉस्पिटलमध्ये गेला आणि वैद्यकीय रिपोर्ट तयार करून कायदेशीर कारवाईला सुरुवात केली.
या संपूर्ण प्रसंगामुळे कंपनीच्या अंतर्गत वातावरणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे शोषण, न मिळालेले ओव्हरटाईम, पगारवाढ रद्द करणं हे सगळं जानकोव्हिकने सोशल मीडियावर शेअर करून सांगितलं, त्यामुळे हा प्रकार केवळ ऑफिसमधील वाद न राहता, कामगारांच्या हक्कांचा गंभीर मुद्दा बनला आहे.