Viral Video of Woman dances with Fire: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्काच बसतो. या डिजिटल युगात कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. पण सोशल मीडियावरून मिळणाऱ्या या प्रसिद्धीसाठी लोक आजकाल काहीही करू लागले आहेत.
स्वत:च्या जीवाची पर्वा न करता मर्यादा ओलांडू लागले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात, एका व्हिडीओसाठी काकी थेट आगीशी खेळू लागल्या आहेत. नेमकं या व्हिडीओमध्ये काकींनी काय केलंय, जाणून घेऊ या…
काकींचा व्हिडीओ व्हायरल (Shocking Video Viral)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक काकी “इश्क ने जला दिया सब कुछ भुला दिया” या गाण्यावर डान्स करताना दिसतायत. पण हा डान्स करताना त्यांनी त्यांच्या जीवाशी खेळ केला आहे. शेगडीजवळ डान्स करत या काकींनी चक्क एक पेपर आगीने पेटवला आणि तो पेट घेतलेला पेपर हातात घेऊन काकी शेगडीजवळ अगदी बिनधास्तपणे डान्स करताना दिसतायत. तसंच तो जळता पेपर काकी आपल्या शरीराच्या आजू-बाजूने फिरवत डान्स करत आहेत. काकींचा हा डान्स पाहून युजर्सना धक्काच बसला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @its_dj_mahesh_official_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल २.५ व्ह्यूज आले आहेत. तसंच “काकी आज सगळीकडे आग लावूनच गप्प बसणार आहेत” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काकू तुमच्या पाया पडतो तुम्ही दुसरं क्षेत्र निवडा” तर दुसऱ्याने “काकू घर पेटवल्याशिवाय राहत नाही” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “चटका लागल्यावर भानावर येतील काकू”
दरम्यान, याआधीही सोशल मीडियावर मिळणाऱ्या काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी अनेकांनी हद्दच पार केली आहे. सध्या सोशल मीडियावर काकींच्या व्हिडीओची प्रचंड चर्चा आहे. या व्हिडीओवर काहींनी संताप व्यक्त केला आहे, तर काहींना काकींना बोल लगावले आहेत.