Viral Video: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवतात. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.

जबाबदारी माणसाला सगळं काही शिकवते, असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, मेहनत आणि अथक परिश्रमांशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही. आपली पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण दररोज जीवाचं रान करतात. तर दुसऱ्यांना अन्न वेळेत पोहोचावं यासाठी डिलिव्हरी बॉयदेखील अथक परिश्रम घेतात.

असं म्हणतात कोणतंच काम लहान किंवा मोठं नसतं. पण काही माणसं आपल्या श्रीमंतीचा असा माज करून दुसऱ्यांना कमी लेखतात. सध्या अशीच घटना एका डिलिव्हरी बॉयबरोबर घडलीय; ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक फूड डिलिव्हरी बॉय रस्त्याच्या कडेला एका महिलेची फूड डिलिव्हरी वस्तू घेऊन उभा आहे. डिलिव्हरी बॉय दिसताच तितक्यात महिला त्याच्याजवळ जाते तिची वस्तू घेते. पण या सगळ्यात त्या फूड डिलिव्हरीसाठी लागणारे पैसे ती भर रस्त्यात त्याच्या अंगावर उडवते. पैसे उडवताच तो तिथे खाली पडलेले पैसे गोळा करू लागते. दरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अपमान माणसाला रडवतो, शिकवतो, पण लक्षात ठेवा आयुष्य घडवतो.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच हा व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तिचा माज देवच उतरवेल” तर दुसऱ्याने “अशा लोकांना माणुसकीची जाणच नसते” अशी कमेंट केली. तर एकाने “कोणत्याही माणसाला कमी लेखू नका, पैसा काय आज आहे उद्या नाही” अशी कमेंट केली.