Viral video: आजोबा हे नातवाचा पहिला मित्र असतो, आणि नातु हा आजोबाचा शेवटचा मित्र असतो. नातवंडं म्हणजे आजोबांसाठी दुधावरची साय. अगदी जीव की प्राण. ते वागतातच इतकं प्रेमाने तर कशाला नातवंडं घाबरतील त्यांना.आपल्यापैंकी प्रत्येकजण आपल्या आजी-आजोबांचा लाडका असेल. घरात आजी-आजोबा असण प्रत्येकाला आवडते शिवाय त्यांच्याकडून लाड पूर्ण करून प्रत्येकजण घेत असतो. कारण आजी-आजोबाशिवाय संपूर्ण घर रिकाम वाटत. वय फक्त एक संख्या आहे, हे या आजोबांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय! नातवाच्या लग्नात स्टेजवर जाताच आजोबांनी असा धम्माकेदार डान्स केला की, लग्नातील प्रत्येकजण अवाक् झाले. त्यांच्या एनर्जेटिक स्टेप्स पाहून तरुणाईलाही लाज वाटली असेल. सोशल मीडियावर सध्या आजोबांच्या डान्सचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, एकट्या आजोबांनी संपूर्ण लग्न गाजवलंय.

सोशल मीडियावर सतत काही न काही व्हायरल होत असते. कपल डान्स तर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. यात आता वृद्ध लोकांचाही समावेश होतोय. या व्हिडीओमध्ये आजोबा मनसोक्त डान्स करत असल्याचे दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आम्ही असं का म्हणतोय, याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यावर येईल. या आजोबांचा डान्स पाहून तुम्हीही तोंडात बोटं घातल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे आजोबा कशाचीही तमा न बाळगता स्टेजवर ऊभं राहून नाचत आहेत.आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, संपूर्ण परिसर वऱ्हाडी मंडळींनी भरलेला दिसून येत आहे. काही वेळानंतर संपूर्ण वऱ्हाडी मंडळी डीजेच्या गाण्यावर डान्स करत आहेत. तिथेच काही तरुणही डान्स करत आहेत, मात्र काही वेळातच सर्वांचं लक्ष या आजोबांकडे जातं. आजोबांनी डान्स करायला सुरुवात करताच बघ्यांनी या आजोबांना जोरदार दाद दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर motivation_line_ या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय.