scorecardresearch

Video: गाढवामागे बसून निघाली वरात; पाकिस्तानमधील जोडप्याचा लग्नातला व्हिडीओ होतोय व्हायरल

पाकिस्तानमधला हा व्हिडीओ सध्या भारतामध्येही व्हायरल होत आहे.

pakistan viral video
पाकिस्तानमधील व्हायरल व्हिडीओ (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Viral video: असं म्हणतात की, लग्न फक्त एकदाच होत असतं. लग्नाची गोड आठवण सदैव सोबत राहावी यासाठी लोक पाण्यासारखे पैसे खर्च करतात. गेल्या काही वर्षांमध्ये लग्नाला मोठ्या इवेंटचे स्वरुप आले आहे. आता लग्नापूर्वी वेडिंग फोटोशूट करणे शास्त्र मानले जाते. नवरा आणि नवरी नाचल्याशिवाय मंडपामध्ये प्रवेश सुद्धा करत नाही. लग्न झाल्यानंतर हनिमूनच्याही आधी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. त्यानंतरच लग्न खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येते.

सध्या सोशल मीडियावर विविध लग्नसमारंभातील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात नवरा-नवरी यांच्या मंडपात एंट्री मारतानाच्या व्हिडीओना हजारो-लाखो व्ह्यूज असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सूट-पठाणी घातलेला नवरा आणि त्यांची साडी नेसलेली नवरी गाढवामागे जोडलेल्या गाडीवर बसून एंट्री मारत असल्याचे पाहायला मिळते. हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानमधला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवरा-नवरीच्या आजूबाजूला असलेले लोक त्यांना पाहून हसत आहेत. काहीजण त्यांचा व्हिडीओ तयार करण्यात, फोटो काढण्यात व्यग्र आहेत. लग्नातील व्हिडीओग्राफरद्वारे हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामसह इतर सोशल मीडिया साइट्सवर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. काहींनी ही कृती प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली असल्याचे म्हटले आहे. तर काहीजणांनी या व्हिडीओवरुन पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे.

आणखी वाचा – ट्रेन ‘या’ शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का? तुमच्या रेल्वे तिकिटावरील ‘या’ अक्षरांचे खरे अर्थ जाणून घ्या

सध्या पाकिस्तानमधील सामान्य जनतेचे महंगाईमुळे कंबरडे मोडले आहे. ‘डेली पाकिस्‍तान’ या वृत्तपत्रकाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत २२ रुपये प्रति लिटरवरुन तब्बल २७२ रुपये प्रति लिटर झाली आहे. महागाईवरुन सरकारवर टिका करण्यासाठी या जोडप्याने ही कृती केली आहे अशा कमेंट्स देखील व्हिडीओखाली पाहायला मिळाल्या आहेत. २०२१ मध्ये, शासनाद्वारे वाढवण्यात आलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमतीवरुन एका पाकिस्तानी कन्टेंट क्रिएटरने त्याच्या बायकोला लग्नामध्ये गाढव भेट म्हणून दिल होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 18:15 IST