Rahul Gandhi Viral Video: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भररस्त्यात स्वतःला चाबकाचे फटके मारून घेतल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतला हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. भारत जोडो यात्रेच्या ५७ व्या दिवशी राहुल गांधींनी तेलंगणा येथे सुरु असणाऱ्या बोनालू महोत्सवात हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात पोतराजांसह राहुल चाबकासारखा जाड दोरखंड उचलून पोतराज रूप धारण केले होते. बोनालू हा तेलंगणा, हैदराबाद व आजूबाजूच्या काही राज्यात साजरा होणारा १८ व्या शतकाच्याही आधीपासूनचा सण आहे.

पोतराज म्हणजे काय?

राहुल गांधी यांनी धारण केलेले पोतराज रूप नेमके काय आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? खरंतर आपण अगदी शहरातही अनेकदा असे पोतराज पहिले असतील पण त्यामागे एक विशिष्ठ कथा आहे. हिंदू देवी महाकालीचा भाऊ ‘पोथाराजू’ बोनम घेऊन जाणाऱ्या महिलांच्या रक्षणाची भूमिका घेतो. बोनालू सणातील पोथराजू हे मुख्य आकर्षण आहे, घाटमाथ्याने शिगम वाहणाऱ्या बहिणींचे रक्षण करणे ही पोतराज रूपातील भावाची जबाबदारी असते. स्त्रीरूपातील देवीच्या रक्षणासाठी तो स्वतःच्या शरीरावर चाबूक मारून आवाज करतो. .

बोनालू सणाचे माहात्म्य

प्राप्त माहितीनुसार, बोनालू हा सण आषाढ मासात साजरा केला जातो. पोचम्मा, येल्लम्मा, मैसम्मा, पेद्दम्मा, डोक्कलम्मा, अंकलम्मा, मरेम्मा, नूकलम्मा आणि पोलेरम्मा ही सर्व मातृदेवतेची प्रादेशिक रूपे आहेत. बोनालू च्या निमित्ताने या देवतांची पूजा केली जाते. दरवर्षी हजारो भाविक महाकालीला नमन करण्यासाठी येथे जमतात.

राहुल गांधी यांनी धारण केलं पोतराज रूप

भाजपा आमदारला नग्नावस्थेत तरुणीने केला व्हिडीओ कॉल अन.. ‘सेक्स्टॉर्शन’ची तक्रार दाखल, नेमकं काय घडलं?

दरम्यान भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांची विविध रूपं पाहायला मिळाली आहेत. कधी लहानग्यांना कराटेचे प्रशिक्षण देणारे, कधी सोनिया गांधी यांच्या शूजची लेस बांधण्यासाठी भररस्त्यात गुडघ्यावर बसणारे, कधी पुशप्स चॅलेंज लावणारे राहुल गांधी भारत जोडो यात्रेमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. राहुल गांधींच्या हा नवा व्हिडीओ आपल्याला कसा वाटला, कमेंट करून कळवा.