scorecardresearch

Video: रावण दहनात आला भन्नाट ट्विस्ट; रामलीला सुरु असताना रावणाने बंदूक काढली अन…

Dussehra 2022 Viral Video: देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबईतल्या शिवतिर्थापासून ते अयोध्येपर्यंत अनेक ठिकाणी रावण दहन करण्यात आले.

Video: रावण दहनात आला भन्नाट ट्विस्ट; रामलीला सुरु असताना रावणाने बंदूक काढली अन…
Viral video Ravana Doing Bhangara During Ramleela Ravana Dahan (फोटो : इंस्टाग्राम)

Viral Video: देशभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबईतल्या शिवतिर्थापासून ते अयोध्येपर्यंत अनेक ठिकाणी रावण दहन करण्यात आले. अशातच स्वतः रावणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एकीकडे आदिपुरुषमधील सैफ अली खानने साकारलेल्या रावणाला ‘छपरी’ म्हणत टीका होत असताना हा हटके आणि मस्तमौला रावण मात्र नेटकऱ्यांच्या अगदीच पसंतीला उतरत आहे. अवघ्या ३० सेकंदाच्या या व्हिडिओला तुफान प्रतिसाद मिळत आहे. रावणाचे हे कधीही न पाहिलेले रूप नक्की काय आहे हे जाणून घेऊयात..

या व्हायरल व्हिडिओमध्ये रामलीला सुरु आहे, आजूबाजूचा परिसर पाहता हा पंजाबातील व्हिडीओ असल्याचे दिसतेय. रावण दहनापूर्वी रामलीलेत रावणाने आपल्या आयुष्यातील मजा अनुभवण्याचा जणू काही प्रणच घेतला आहे. व्हिडिओत आपण पाहू शकता की, “मित्रा दा ना चलदा” या पंजाबी गाण्यावर रावणाचे भांगड्याचा ठेका धरला आहे. रावणाचा हा भन्नाट अंदाज प्रेक्षकांना भलताच आवडला आहे. आपण पाहू शकता की रावणाकडे एक बंदूक होती ती बाजूला काढून ठेवली आणि मग तो जोरदार भांगडा करू लागला.

रावणाचा भांगडा पाहिलात का?

Viral: महिला पत्रकाराने रिपोर्टींग करताना माईकवर कंडोम लावला अन.. भर पावसातला ‘तो’ फोटो चर्चेत

दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून त्याला जवळपास २३,००० व्ह्यूज आणि सुमारे ३०० रिट्विट मिळाले आहेत. यावर अनेकांनी भन्नाट कमेंट करून रावणाच्या या डान्सची वाहवा केली आहे. अजून करा पंजाब मध्ये रामलीला असे काहींनी म्हंटले आहे तर याला म्हणतात आयुष्याची मजा घेणं अशीही भावना अनेकांनी कमेंटमध्ये व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या