Viral Video Rickshaw Driver Slap Little Girl Selling Roses To Passenger : पोटा-पाण्यासाठी कोणाला काय करावे लागेल याचा अंदाज बांधणे कठीण असते. त्यातच रस्त्याकडेला राहणाऱ्यांचे आयुष्य आपल्यापेक्षाही कठीण असते. ना राहण्याची सोय, ना खाण्यापिण्याची व्यवस्था. त्यातच प्रत्येक गाडीसमोर जाऊन एखादी वस्तू विकणे किंवा हात पसरवून पैसे मागणे वाटते तितके सोपे नसते. तर आज असेच एक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एका रिक्षाचालकाने रस्त्याकडेला फूल विकणाऱ्या मुलीला कानाखाली मारल्याचे दिसते आहे.

‘राईड विथ शिखर’ या कन्टेन्ट क्रिएटरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये रस्त्याच्या दुभाजकावर बसून एक मुलगी रडताना दिसते आहे. तिच्या जवळून एक बाईकचालक जात असतो. मुलीला रडताना पाहून तो काही क्षणांसाठी थांबतो आणि तुला कोणी मारलं का, असेसुद्धा विचारतो. तरीही मुलगी रडत असते. कॅप्शननुसार ‘मुलगी सिग्नलवर गुलाबाची फुलं विकत असते. प्रवाशाला गुलाब विकण्यासाठी ती मुलगी रिक्षाच्या मागे धावत होती. त्यामुळे रिक्षाचालकाने रागात तिच्या कानाखाली मारली’.

रिक्षाचालकाने मारायची गरज होती का? (Viral Video)

तर मुलीला रडताना पाहून कन्टेन्ट क्रिएटर शिखरने मुलीचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला विचारले, “मी तुझ्याकडची गुलाबाची फुले घेऊ का?” पण, मुलीने पैसे घेण्यास किंवा प्रतिसाद देण्यास नकार दिला. कारण- ती त्या घटनेने हादरली होती. मग त्या क्षणाला नेमके काय करावे, मुलीची मदत नेमकी कशी करावी हे त्याला कळत नव्हते. शेखरने तिच्या डोक्यावर हळुवारपणे हात ठेवून तिचे सांत्वन केले आणि अशा प्रकारे वाहनांच्या मागे धावू नये हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

प्रयत्नांना न जुमानता, मुलीने कोणतीही मदत स्वीकारली नाही. पैसे मिळाले म्हणून नाही, तर जगाने तिला अपयशी ठरवले म्हणून ती रडली. त्यामुळे अशा परिस्थितीत असलेल्यांना अधिक सहानुभूती दाखवण्याचे आवाहन त्यांनी व्हिडीओद्वारे सगळ्यांना केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ride_with_shikhar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “तिने पैसे घेतले नाहीत. त्यावरून ती किती दुखावली होती हे दिसून येते. गरिबी हा एक शाप आहे”, “रिक्षाचालकाने मारायची गरज होती का? शारीरिक हिंसाचार करणे बरोबर नाही”, “एखाद्या स्वयंसेवी संस्थेने अशा प्रकरणात हस्तक्षेप केला पाहिजे आणि जो कोण तिला असे काम करण्यास भाग पाडत आहे, त्याला तुरुंगात पाठवावे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.