आपल्यातील प्रत्येकालाच आईने बनवलेली पोळी-भाजी खायला खूप आवडते. सकाळी नाश्ता करताना चहाबरोबर चपाती, ऑफिसला पोळी-भाजीचा डबा आणि दुपारी, रात्री जेवणात भाजी-चपाती आपण सगळेच आवडतीने खातो. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात मशीनच्या साह्याने झटपट पोळ्या बनवल्या जात आहेत.

सुरुवातीला व्हिडीओमध्ये एका यंत्रात मशीनच्या मदतीने पीठ मळून घेतले जात आहे. तसेच ही प्रक्रिया चालू असताना वरून पाइपद्वारे पाणी आणि कामगार पिठात मधे मधे तेल ओतताना दिसत आहेत. पीठ मळून झाल्यानंतर मोठ्या पोळपाट लाटण्याच्या (रोलिंग पिनच्या) साह्याने पोळी लाटून घेतली जात आहे. त्यानंतर वर्तुळाकार साच्याच्या मदतीने या लाटलेल्या पोळ्यांना आकार दिला जातो आहे. कशा प्रकारे मशीनच्या मदतीने पोळ्या तयार करण्यात आल्या आहेत. एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

हेही वाचा…मुंबईकरांना असली कसली जीवघेणी घाई; बेस्ट बसमधील प्रवाश्याचा ‘हा’ धोकादायक Video एकदा पाहाच

व्हिडीओ नक्की बघा :

आकार दिलेल्या पोळ्या कामगार दुसऱ्या मशीनवर ठेवताना दिसत आहेत. काही वेळात या पोळ्या गरमागरम भाजून मशीनद्वारे बाहेर येतात आणि अशा प्रकारे मशीनच्या मदतीने अशा खास पोळ्या तयार केल्या जातात. व्हायरल व्हिडीओत ज्या कारखान्यात पोळ्या बनवल्या जात आहेत, ती एक संस्था आहे; जी मशीनच्या मदतीने पोळ्या बनवून शाळेतील विद्यार्थ्यांना देते. सोशल मीडियाचा डिजिटल क्रिएटर अभिषेक याने हा व्हिडीओ शूट केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @thefoodiehat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘ही संस्था शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्यदायी आणि स्वयंचलित पद्धतीने पोळी बनवते’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. . नेटकरी व्हिडीओ पाहून, या पोळीला आईच्या हाताची चव येणार नाही, असे म्हणताना दिसत आहेत. एका युजरचे म्हणणे आहे की, असं आपण घरी करू शकलो असतो, तर बरं झालं असतं. घरी जेवण बनवणाऱ्यांना थोडा आराम मिळाला असता. अशा अनेक कमेंट व्हिडीओखाली तुम्हाला पाहायला मिळतील.