Video Shows Groom And Bride Married In Hospital : लग्न हा आयुष्यातील खास क्षण असतो. आई-बाबा, आजी-आजोबा, घरातील भावंडे लग्नासाठी इतके उत्सुक असतात, तर त्या लग्नबंधनात अडकणाऱ्या जोडप्याचा विचार करा; त्यांच्यासाठी हा दिवस किती महत्त्वाचा असेल. तसेच या उत्साही वातावरणादरम्यान एखाद्या जोडप्याचे लग्न मोडले किंवा लग्नाची तारीख पुढे घ्यावी लागली तर त्यांना किती त्रास होत असेल. पण, अशी परिस्थिती जरी आली तरी होणारा नवरा सिनेमातील हिरोसारखा आपल्याशी लग्न करेल अशी प्रत्येक मुलीची अपेक्षा असते. तर आज मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात अशीच एक अनोखी घटना घडली आहे.

तर घडले असे की, आदित्य सिंग आणि नंदिनी सोलंकी यांनी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय्य तृतीयेला लग्न करण्याचे ठरवले होते. पण, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होत. लग्नाच्या बरोबर एक आठवडा आधी नंदिनी आजारी पडली. तिला प्रथम तिच्या गावी कुंभारज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या गावापासून जवळजवळ ५० किमी अंतरावर असलेल्या बियाओरा येथे उपचारासाठी तिला हलवण्यात आले. त्यानंतर तिची प्रकृती सुधारली असली तरी डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता, ज्यामुळे आदित्य आणि नंदिनीचे लग्न होणे अशक्य होते. तसेच यात आणखीन भर म्हणजे दोघांच्या पत्रिकेनुसार पुढचा शुभ मुहूर्त हा दोन वर्षांनी होता, त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी त्याच क्षणी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रेम प्रत्येक अशक्य गोष्टीला शक्य करते (Viral Video )

नंदिनी आणि आदित्यची परिस्थिती समजून घेता रुग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांना पूर्णपणे सहकार्य केले. बाह्यरुग्ण विभागाचा (ओपीडी) परिसर स्वच्छ केला आणि सुंदर पद्धतीने सजवला; ज्यामुळे हॉस्पिटल एका लग्नाच्या हॉलमध्ये बदलले. आदित्य सिंग वरात घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले. पण, यादरम्यान त्यांनी हॉस्पिटलमधील इतर रुग्णांचा विचार करून कोणताही बँड वाजवला नाही किंवा मोठ्याने उत्सवदेखील साजरा केला नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा

त्यानंतर आदित्य आणि नंदिनीचे लग्न हॉस्पिटलमध्येच रात्री १ वाजता लावण्यात आले. कुटुंब, डॉक्टर, परिचारिका यांच्या उपस्थितीत या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात केली. सर्वात हृदयस्पर्शी क्षण तेव्हा आला, जेव्हा आदित्यने नंदिनीला अगदी हळूवारपणे उचलले आणि अग्नीभोवती सात फेरे घेतले आणि हॉस्पिटलमध्ये उपस्थित सगळ्यांनीच त्यांच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @3Chandrayaan या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि ‘प्रेम प्रत्येक अशक्य गोष्टीला शक्य करते’ अशी कमेंट एका युजरने केली आहे.