Viral Video Shows Dad Brought Dream Bed For His Daughter : सायकल, बार्बी सेट, व्हिडीओ गेम्स, कॉम्प्युटर गेम्स, अगदी शिडी असणारा लहान मुलांचा डबल बेडसुद्धा आपल्याकडे असावा, अशी कित्येक लहान मुलांची इच्छा असते. पण, अनेकदा परिस्थितीमुळे किंवा अगदी एकाच घरात दोन ते तीन मुले असल्यामुळे एकाचे हट्ट पुरवले की, सगळ्यांचे पुरवावे लागतील, या भीतीने पालक तशी कृती करायला धजावत नाहीत. त्यामुळे लहानपणी आपल्या अनेकांच्या इच्छा अशाच अपूर्ण राहिल्या आहेत. पण, सध्याच्या काळात आई-बाबा दोघेही कामाला जात असल्यामुळे मुलांचे हट्ट पुरवणे थोडे सोपे झाले आहे.
व्हायरल व्हिडीओत एका चिमुकलीची इच्छा पूर्ण झाल्याचे दिसते आहे. चिमुकलीला शिडी असणारा लहान मुलांचा डबल बेड हवा असतो; तर बाबा चिमुकलीला अगदी खास पद्धतीने सरप्राईज देतात. बाबा चिमुकली येण्याआधी डबल बेड बेडरूममध्ये नेऊन ठेवतात. त्यानंतर बाबा चिमुकलीला घेऊन बेडरूममध्ये जातात. डबल बेड बघताच चिमुकली धावत जाते आणि बसते. दुकानात पाहिलेला डबल बेड बाबांनी आपल्यासाठी खरेदी करून आणला आहे हे पाहून चिमुकलीचा आनंद गगनात मावत नसतो.
लहानपणीचा ड्रीम बेड (Viral Video)
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, बाबांनी आवडीचा डबल बेड आणलेला पाहून लेकीचा आनंद गगनात मावत नाही. बेड बघताच ती बाबांना जाऊन घट्ट मिठी मारते. ‘आवडला का बेड’, असे बाबा विचारताच चिमुकली ‘हो’, असे उत्तर देते. त्यानंतर ती शिडीवर चढून डबल बेडवर बसून बघते, त्यावर झोपते आणि तिचा आनंद व्यक्त करताना दिसते. ‘बाबा आपल्या लेकीसाठी काहीही करायला तयार असतो’, असा मजकूर व्हिडीओवर लिहिण्यात आला आहे. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @thefakemediia या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘तिने ज्या प्रकारे बाबांना मिठी मारली ते पाहून मन भारावून गेले’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून “हा माझा लहानपणी ड्रीम बेड होता”, “व्हिडीओ बघून मी का खूश होतोय”, “व्हिडीओ बघून मला खरंच रडू आले”, “मुली भाग्यवान असतात” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्याचे दिसत आहेत.