Video Shows Daughter Bring Her Own Doctor Kit To The Hospital : लहान मुले मनाने स्वच्‍छ, निर्मळ असतात. त्‍यांना चांगले आणि वाईट यातला फरक एवढा कळत नाही. पण, असे असले तरीही ही मुलं कधी काय करतील याचा नेम सुद्धा नसतो. पण, त्‍यांची निरागसता आणि मस्‍ती पाहून प्रत्‍येक जण हसल्‍याशिवाय अजिबात राहत नाही. कधीकधी त्यांच्या भन्नाट आणि गोड कृतींनी ते सगळ्यांचेच मन जिंकतात. तुमच्यासाठी खोटं-खोटं पार्लर उघडतात तर कधी खोटं जेवण बनवून खाऊ घालतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे…

व्हायरल व्हिडीओत एका चिमुकलीचा आहे. चिमुकलीच्या बाबांची तब्येत बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले असते. बाबांना भेटण्यासाठी चिमुकली हॉस्पिटललमध्ये तर जाते. पण, चिमुकली स्वतःबरोबर खेळण्यातील डॉक्टर किट सुद्धा घेऊन जाते. यामधले खोटे-खोटे इंजेक्शन असते ते काढून बाबांना आणि बाबांच्या शेजारी असणाऱ्या रुग्णाला देते. त्यानंतर स्वतःच खुदकन असते आणि हॉस्पिटलमधील माहोल काही क्षणासाठी का होईल आनंदमय होऊन जातो.

आता बाबा लवकर बरे होतील (Viral Video)

लहान मुलांना खेळण्यासाठी डॉल हाऊस, किचन सेट किंवा आणखीन कोणतीही खेळणी आणून द्या. त्याचा कसा उपयोग करून खेळायचं हे त्यांना अगदी बरोबर माहिती असते. तसेच या चिमुकलीने सुद्धा आज केले. बाबा आजारी आहेत ते समजताच ती खेळण्यातला डॉक्टर सेट घेऊन बाबांजवळ हॉस्पिटलमध्ये पोहचली. घरात एखादे भांडण किंवा दुःखद प्रसंग घडून गेल्यावर घरात शांतता असते. तेव्हा ही लहान मुळेच असतात जी कुटुंबातील सदस्यांना दुःख विसरायला आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न करतात.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Desh Dynamics या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘वडिलांची तपासणी करण्यासाठी मुलगी स्वतःचे डॉक्टर किट रुग्णालयात घेऊन येते’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत आणि “आता बाबांना दोनदा उपचार दिला जातो आहे. दोनदा इंजेक्शन, दोनदा औषध”, “आनंद हे सर्वोत्तम औषध आहे”, “आता बाबा लवकर बरे होतील” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.