Viral Video Shows Daughter’s Celebrate Father’s Birthday In Unique Style : सध्या वाढदिवस साजरा करणे म्हणजे एक फॅशनच आहे. कोण एखाद्या फार्महाउसमध्ये जाऊन, तर कोण महागड्या रेस्टोरंटमध्ये जाऊन स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यात सुख मानतो. पण, सगळ्यांनाच वाढदिवस थाटामाटात साजरा करता येत नाही. कारण – प्रत्येकाकडे तेवढे पैसे नसतात. पण, जो मनाने श्रीमंत असतो, तो छोट्या-छोट्या गोष्टीतसुद्धा सुख शोधतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये चिमुकल्यांनी बाबांच्या वाढदिवसासाठी खास सजावट केली आहे.

सर्व वाढदिवस भेटवस्तू, केक किंवा सुंदर सजावटीसह साजरे होत नाहीत तर काही फक्त आनंदाने, प्रेमाने साजरे केले जातात.. व्हायरल व्हिडीओत फिलिपिन्समधील एका छोट्या घरात, वडील कामावरून परतले तेव्हा त्यांनी कधीही अपेक्षा न केलेली आणि आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट बघितली. मुले वयाने लहान, जॉबला न जाणारी होती; पण त्यांचे वडिलांवर भरपूर प्रेम होते आणि त्यांच्याकडे थोडी कल्पनाशक्ती होती. त्यामुळे त्यांनी बाबांच्या वाढदिवसाला हटके सजावट केली.

खरं प्रेम हे पैशात मोजता येत नाही (Viral Video)

पैसे नसल्यामुळे वाढदिवसाची सजावट करायला त्यांच्याकडे फुगे नव्हते. मग त्यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हवा भरली, त्यांना दोरीने बांधले आणि फुग्यांसारखे छतावरून लटकवले. एवढेच नाही, तर रंगीत पेन्सिलने त्यांनी प्रत्येकावर ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा’ असेसुद्धा लिहिले. त्यानंतर स्वयंपाकघरात जे काही शिल्लक होते, त्यातून त्यांनी एक छोटासा केकदेखील त्यांनी तयार केला. त्यानंतर वडील आत आले आणि त्यांनी खोली पाहिली तेव्हा त्यांना जाणवले की, तो जगातील सर्वांत श्रीमंत माणूस आहे- संपत्तीने नाही; तर प्रेमाने.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सुंदर क्षणाचे साक्षीदार झालेल्या एका शेजाऱ्याने या सजावटीचे फोटो सोशल मीडियावर @real.heroic.stories या अकाउंटवरून शेअर केले. ‘आपण अनेकदा विसरतो अशा एका गोष्टीची आठवण करून देतो. एखादा दिवस साजरा करण्यासाठी तुम्हाला पैशांची नाही; तर फक्त प्रेमाची गरज असते’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरीसुद्धा व्हिडीओ पाहून भारावून गेले आहेत आणि “खरं प्रेम हे पैशात मोजता येत नाही”, “पैसा असो वा नसो; मनाची श्रीमंती हवी!”, “त्यांच्याकडे पैसे नाही; पण प्रेम आहे” आदी अनेक कमेंट्स नेटकरी करताना दिसत आहेत.