Video Shows Man Saved A Tiny Cat : एकीकडे प्राण्यांवर जीवापाड प्रेम करणारे तर दुसरीकडे प्राण्यांना घाबरणारी मंडळी सुद्धा असतात. घरातील पाळीव प्राण्यांना आपण शिस्त, सवयी लावू लावतो. जेणेकरून ते लहान मुलं, तरुण, वृद्ध आणि इतर प्राण्यांवर हल्ला करणार नाहीत. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; यामध्ये पाळीव प्राण्याने एका भटक्या मांजरीवर हल्ला करायला जाणार असतो; तितक्यात मालकाने केलेली कृती तुमचेही मन जिंकेल एवढे तर नक्की…

व्हायरल व्हिडीओत एक माणूस रस्त्याकडेला मोबाईलमध्ये बघत उभा असतो. त्याच्या मागून एक भटकी मांजर चालत येत असते. मांजर बराच वेळ एकटक श्वानाकडे बघते. आपल्यावर हल्ला होणार यासाठी आधीपासूनच स्वतःला तयार करतेय असेही वाटते. तितक्यात मालकाच्या पाळीव श्वानाची एंट्री होते तो मांजरीवर हल्ला करायला जाणार इतक्यात मालक श्वानाला घट्ट पकडून ठेवतो आणि अक्षरशः त्याच्या अंगावर बसतो आणि त्याचे तोंड सुद्धा पकडतो आणि मांजरीचा जीव वाचवतो.

पटकन विचार करून घेतला चांगला निर्णय (Viral Video)

अनेकदा पाळीव प्राण्यांचे मालक मांजर, श्वानांना फेरफटका मारायला घेऊन जातात. तेव्हा जर पाळीव प्राण्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या माणसांवर हल्ला केला तर ते इतरांना दोष देऊन मोकळे होतात. पण, आज व्हायरल व्हिडीओत पाळीव प्राण्याच्या मालकाने जबाबदारी घेत मांजरीचा जीव वाचवला आणि पाळीव श्वानाला हल्ला करण्यापासून थांबवले. त्यामुळे मांजरीला सुरक्षित ठिकाणी पळून जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. काही सेकंदांनंतर, तो माणूस शांतपणे त्याच्या श्वानाला घरात परत ओढताना दिसतो.जे अगदीच एखाद्या सिनेमातील सीनप्रमाणे वाटते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @momos.usa या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘एक खरा हिरो: त्याने एका श्वानपासून एका मांजरीला वाचवले’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून श्वान मालकाचे कौतुक करत आहेत आणि “त्याने श्वानाला मांजरीवर हल्ला करण्यापासून रोखले… उत्तम काम केले आणि दोघांच्याही भावना दुखावल्या नाहीत! पटकन विचार करून चांगला निर्णय घेतला”, “त्याने जबाबदारी घेतली आणि त्याच्या श्वानाला रोखले”; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.