Video Shows Elderly Man Sell Handkerchief At Roadside : रस्त्याकडेला छोट्या छोट्या वस्तू विकणापासून ते अगदी मोठ्या मोठ्या मॉलमध्ये दुकाने असण्यापर्यंत अनेक व्यापारी त्यांच्या वेगेवेगळ्या वस्तू विकताना दिसतात. यामध्ये अगदी नाश्त्याच्या पदार्थांपासून ते अगदी महागड्या कपड्यांचा समावेश असतो. प्रत्येक व्यापारी आपल्या व्यवसायासाठी वेगेवगळ्या युक्त्या वापरतो. त्यामुळे अनेकदा या व्यापाऱ्यांना पाहून हे दिवसाला किती कमवत असतील असा अंदाज आपण बांधण्यास सुरुवात करतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

रस्त्याकडेला एक आजोबा रुमाल विकतात. त्याच्याकडे फक्त एकाच प्रकारचे रुमाल मिळतात. पण, हे रुमाल चांगल्या क्वालिटीचे असतात. ‘एकच रुमाल विकायचा पण चांगल्या क्वालिटीचा विकायचा असे ते आवर्जून म्हणतात. सकाळी ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास आजोबा रुमाल विकण्यास सुरुवात करतात. त्यानंतर दुपारी विश्रांती घेऊन पुन्हा ४ च्या सुमारास रुमाल विकायला बसतात. दिवसाला एक रुमाल जरी विकला तरी त्यांना आनंद आहे असे ते सहज बोलून गेले. एकदा बघाच हा व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

मानलं आजोबा तुम्हाला (Viral Video) :

इचलकरंजी येथील डीकेटीई कॉलेजसमोर राजवाडा चौक आहे तिथे हे आजोबा रुमाल विकतात. जवळच कॉलेजमध्ये येणारी तरुणी या आजोबांना दररोज रुमाल विकताना पाहायची. मग आजोबांना मदत करण्यासाठी तिने त्यांचा व्हिडीओ काढायचे ठरवले. त्यांच्याशी संवाद साधून ते किती वाजता रुमाल विकायला येतात हे सुद्धा विचारून घेतले आणि त्यांच्याकडून रुमाल सुद्धा खरेदी केले. तर काम हेच परमेशवर असे म्हणणारे हे आजोबा २५ ते ३० रुपयांना त्यांच्याकडे रुमाल विकतात आणि ह्या वयात कष्ट करून पोट भरतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @nagpurchi_santri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून ‘ह्या वयात बाबा कष्ट करून पोट भरतात ,मानलं बाबा तुम्हाला’, ‘निस्वार्थी आणि मनाने साफ असणारी शेवटची पिढी’,’ तुमच्या एका रीलमुळे त्यांना नक्कीच मदत होईल’, ‘मी बऱ्याच वेळा यांच्याकडून रुमाल खरेदी केला आहे’, ‘सध्या कमी वेळात श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणाईने शिकले पाहिजे हे कष्टाचा १ रुपया पण आजोबांना मोठा वाटतो’ ; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.